कलम 370 ! काश्मिरी बहिणींनी केलं बिहारमधील 2 भावांशी केलं लग्न, एकाचवेळी सगळे ‘गोत्यात’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बिहारच्या सुपौल जिल्ह्यातून पोलिसांनी बुधवारी दोन काश्मिरी मुलींना ताब्यात घेतले. या दोघी सख्ख्या बहिणी असून जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर या दोन बहिणींनी बिहारमधील दोन भावांशी लग्न केले आणि सुपौलमध्ये राहण्यास सुरवात केली. त्यानंतर पोलिसांनी चौघांना अटक केली व त्यांना काश्मीरमध्ये नेले आहे.

बिहारमधील सुपौलचे रहिवासी परवेझ आणि तबरेज हे दोन तरुण जम्मू-काश्मीरमधील रामबन जिल्ह्यात मिस्त्री म्हणून काम करायचे. त्याचवेळी त्यांचा दोन काश्मिरी बहिणींशी परिचय झाला. या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले होते. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटविण्याच्या घोषणेनंतर दोन्ही जोडप्यांचे अज्ञात ठिकाणी लग्न झाले. त्यानंतर हे चौघे सुपौलमध्ये राहू लागले.

तिकडे काश्मीरमध्ये मुलींच्या वडिलांनी या दोन्ही भावांवर अपहरणाचा गुन्हा दाखल केला. स्थानिक पोलिसांसह काश्मीर पोलिस बुधवारी सुपौलमधील राम बिशनपूर गावात पोहोचले आणि दोन्ही मुलींना ताब्यात घेतले.

दोन्ही मुलींनी पोलिसांना सांगितले की त्यांनी स्वतःहून हे लग्न केले असून त्यांना बिहारमध्ये त्यांच्याबरोबरच राहायचे आहे. काश्मीरला परत जाण्यास दोघी बहिणींनी नकार दिला. मात्र, काश्मीर पोलिसांनी परवेझ आणि तबरेझ दोघांनाही अटक केली आणि पुढील तपासासाठी जम्मू-काश्मीरला नेले आहे. यापूर्वी पोलिसांनी दोन्ही मुलींच्या साक्षीची कलम १६४ अन्वये न्यायालयात नोंद केली आहे.

दोन्ही भाऊ म्हणाले की त्यांनी कोणताही गुन्हा केलेला नाही. प्रौढ असल्याने त्यांना लग्न करण्याचा अधिकार आहे. परवेझ म्हणाला, ‘मी व माझी पत्नी प्रौढ आहोत आणि आम्ही दोघांनी लग्न केले आहे. हा कसलाही गुन्हा नाही.’

आरोग्यविषयक वृत्त –