काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानची ‘नवी चाल’ ; ‘या’ मुद्द्यावरून फेसबूक-ट्विटर कडे केली तक्रार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर पाकिस्तानची प्रत्येक हालचाल फोल ठरली आहे. अशातच आता पाकिस्तानने नवीन पाऊल उचलले आहे. पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले की त्यांनी सोशल नेटवर्किंग कंपनी फेसबुक आणि ट्विटरवर काश्मीरशी संबंधित खाती रद्द करण्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. काश्मीरशी संबंधित संदेश पोस्ट केल्यानंतर रद्द करण्यात आलेले सोशल मीडियावरील खाती रद्द करण्याला पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला आहे.

पाकिस्तानी वृत्तपत्र ‘डॉन’ ने इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन (आयएसपीआर) चे महासंचालक मेजर जनरल आसिफ घफूर यांच्या हवाल्यानुसार सांगितले की, “पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी ट्विटर आणि फेसबुकच्या माध्यमातून ती पाकिस्तानी खाती रद्द करण्याचा मुद्दा उपस्थित केला आहे, ज्याद्वारे काश्मीरला पाठिंबा देण्याचे संदेश पोस्ट करण्यात आले होते.”

आधीपासून रद्द झालेल्या खात्यांविषयी माहिती सामायिक करण्याचे आवाहन गफूरने मीडिया वापरकर्त्यांकडे केले आहे. ते म्हणाले की सोशल मीडिया वरील अकाउंट रद्द करण्यामागील कारण म्हणजे मोठ्या प्रमाणावर भारतीय कर्मचारी या कंपन्यांच्या प्रादेशिक मुख्यालयात काम करतात.

पोलींटर इंस्टीट्यूट संस्थेच्या अहवालानुसार फेसबुकवरील सर्वाधिक तथ्य-तपासक भारतात आहेत. यानंतर याबाबतीत अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर आहे.

आरोग्यविषयक वृत्त