‘कलम ३७०’ ! ही तर ‘तोडगा’ काढण्याची सुरूवात : अनुपम खेर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राज्यसभेची कार्यवाही होताच गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू काश्मीरसंबंधित कलम ३७० हटवण्याची शिफारस करणारे विधेयक संसदेत सादर केले. यानंतर संसदेत काँग्रेसने हंगामा केला. हा निर्णय सार्वजनिक करण्याअगोदर जम्मू काश्मीरमध्ये अतिरीक्त सैन्य तैनात केले गेले. एवढेच नाही तर जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती यांना नजरबंद करण्यात आले. सरकारच्या या निर्णयनांतर बॉलिवूड कलाकारांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

बॉलिवूडला नुकताच रामराम ठोकणारी अभिनेत्री जायरा वसीमने ट्विट करत म्हटले आहे की, “ही वेळही निघून जाईल.” याशिवाय अभिनेता संजय सुरीनेही ट्विट केले आहे की, “काश्मीरमध्ये स्थित सर्व लोकांनी आपली काळजी घ्या.”

 

अनुपम खेर यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “काश्मीरवर तोडगा काढण्यास सुरुवात झाली आहे.” अमित शाह यांनी विधेयक साद करताना कलम ३७० मधील खंड १ वगळता सर्व खंड रद्द करण्याची शिफारस केली आहे. यानंतर विरोधी पक्ष त्यांना घेरायला तयारच होते. हे विधेयक सादर केल्यानंतरच विरोधी पक्षाने हंगामा करायला सुरुवात केली आहे.

अभिनेत्री कंगना रणौतने ट्विट केलं आहे की, “देशाला दहशतवादापासून मुक्त करण्यासाठी कलम ३७० हटवणं हे एक ऐतिहासिक पाऊल आहे. मी दीर्घकाळापासून यावर जोर देत आहे. मला माहिती होतं की, जर कोणी या अशक्य गोष्टीला शक्य करेल तर ते पीएम मोदी असतील. ते फक्त दूर दृष्टीक्षेप असणारेच नाहीत तर गोष्टीत सत्यात उतरवण्याची ताकदही त्यांच्यात आहे. जम्मू काश्मीरसह सर्व भारतवासीयांना ऐतिहासिक दिनाच्या शुभेच्छा देते.”

अभिनेता परेश रावल यांनीही ट्विटमध्ये म्हटले आहे की, काश्मीरच्या घटनांना सबका साथ सबका विकास योजनेसोबत जोडू नका. ही सबका इलाज योजनाही होऊ शकते.”

आरोग्यविषयक वृत्त