जम्मू काश्मीरमधून ३७० रद्द केल्यानंतर ‘ही’ सरकारी कंपनी ‘ऊर्जा’ निर्मिती प्रकल्पात गुंतवणूकीच्या तयारीत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरमध्ये कलम ३७० रद्द केल्यानंतर आता लडाखमध्ये देखील विकासाचा आणि व्यवसायाचा मार्ग मोकळा झाला आहे. रिन्युएबल एनर्जी मंत्रालय (MNRE) लद्दाखमध्ये एक मोठा विंड एनर्जी प्रोजेक्ट लावण्याच्या तयारीत आहेत. मंत्रालयाच्या मते लद्दाखमध्ये विंड एनर्जी प्लॅन्ट लागण्यासाठी मोठी क्षमता आहे.

गुजरात सारखा प्रकल्प

मंत्रालयाचे ज्वाइंट सेक्रेटरी भानू प्रताप यादव यांनी सांगितले की, विंड एनर्जीच्या प्रकरणात लद्दाखमध्ये गुजरात आणि तमिळनाडू सारखे काम करण्यात येईल. सध्या तमिळनाडूमध्ये ८६३१ मेगावॅटची क्षमता आहे तर गुजरातमध्ये ६००० मेगावॅटची. लद्दाख शिवाय अंदमान आणि नॉर्थ ईस्टमध्ये विंड प्रोजेक्ट लावण्याची तयारी केली जात आहे.

सरकार जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या गुंतवणूकीच्या तयारीत

जम्मू काश्मीरमध्ये कलम ३७० रद्द केल्यानंतर एक मोठा फायदा होणार आहे तो ITI सरकारी कंपनीला. सरकार काश्मीरमध्ये इंफ्रास्टक्चरला मजबूती देण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहे. आयटीचे श्रीनगर यूनिट १९६९ पेक्षा कमी आहे. सरकार यांच्या विस्ताराची योजना बनवत आहे. यावर दुरसंचार विभाग गुंतवणूकीचा प्लॅन तयार करत आहे.

श्रीनगर यूनिट बऱ्याच दिवसांपासून तोट्यात आहे. ९० च्या दक्षकात हा प्लॅन्ट नफ्यात होता. या यूनिट मधून १ लाख फोन बनवण्याची क्षमता होती, सध्या विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण दिले जात आहे. सरकार आता पुन्हा एकदा येथे मॅन्यूफॅक्चरिंग प्लॅन्ट लावेल. यामुळे कंपनीला गुंतवणूकीसाठी आधिक फंड मिळणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त