कलम 370 ! अशियाच्या सर्वात मोठ्या ‘या’ हेल्मेट कंपनीने दिला जम्मू काश्मीरमध्ये ‘फॉक्ट्री’ लावण्याचा ‘प्रस्ताव’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरमधील कलम ३७० आणि ३५ A रद्द केल्यानंतर आता अशिया खंडातील हेल्मेट बनवणारी सर्वात मोठी निर्माता कंपनी स्टीलबर्ड डायटेक इंडियाने काश्मीरमध्ये निर्मिती प्लॅन्ट लावण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सोमवारीच सरकारने जम्मू काश्मीरमधील कलम ३७० आणि ३५ A रद्द करण्याची प्रक्रिया सुरु केली आणि आज हे विधेयक लोकसभेत देखील मंजूर करण्यात आले.

काश्मीर खोऱ्यात येणार औद्योगिक क्रांती –
स्टील बर्डने सरकारच्या निर्णयाचे स्वागत करत म्हणाले की, काश्मीर खोऱ्यात नव्या औद्योगिक क्रांतीची सुरुवात होईल तसेच तेथील नागरिकांना रोजगार देखील मिळेल.

स्टीलबर्ड हेल्मेट्सचे चेअरमेन सुभाष कपूर यांनी सांगितले की, कलम ३७० रद्द करण्याचे उचललेले हे पाऊल अत्यंत महत्वाचे आहे, या महत्वपूर्ण निर्णयाने हे निश्चित होईल की काश्मीर खोरे भारताच्या मुख्य प्रवाहात सहभागी होईल आणि आपल्या देशाच्या सामूहिक विकासाचा भाग होईल.ते म्हणाले की आतापर्यंत जम्मू काश्मीरच्या अनेक व्यवसाय कृषि किंवा हस्तकला पर्यंतच मर्यादित आहेत.

ते म्हणाले की आम्ही ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या गुंतवणूक मेळाव्यात तेथे निर्माण यंत्र लावण्याचा योजना आखत आहेत. आम्हाला अपेक्षा आहे की कंपनीला खोऱ्यात मुक्त पद्धतीने काम करण्यास मदत होईल.
कंपनीचे प्रबंध निर्देशक राजीव कपूर यांनी सांगतिले की, आम्हाला वाटते की कंपनी स्थानिक व्यवसायांच्या बरोबरीने आपली सुरुवात करु शकेल. विविध राज्यात देखील अशाच प्रकारे प्रगतीला सुरुवात झाली आहे, हीच सुरुवात स्थानिक लोकांना चांगली संधी निर्माण करेल.

आरोग्यविषयक वृत्त –