आता महाराष्ट्रात भाजप विधानसभा ‘स्वबळा’वर लढणार ?, कलम 370 हटविल्याचा ‘फायदा’ ?

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या शानदार यशानंतर भाजपने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजानदेश यात्रा काढून याची सुरुवात केली आहे. मात्र भाजपची महाराष्ट्रात शिवसेनेशी युती असल्याने आता ते या निवडणुकीत शिवसेनेला सोबत घेतात कि नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मात्र काल केंद्र सरकारने कलम ३७० रद्द करण्या च्या घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे भाजपला याचा मोठा फायदा मिळण्याची शक्यता सध्या राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे शिवसेनेला सोबत न घेता हि विधानसभा निवडणूक लढवावी असा सूर देखील भाजपमधून निघत असून पक्षश्रेष्ठि देखील हाच निर्णय घेऊ शकतात.

कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयामुळे भाजप राज्यात एकहाती सत्तेत येऊ शकते. मागील निवडणुकीपेक्षा जास्त यश स्वबळावर लढल्यास मिळू शकत असल्याची शक्यता सध्या दिसून येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरी शिवसेनेशी आमची युती भक्कम असल्याचे म्हटले असले तरी जागावाटपावरून या दोन पक्षांमध्ये खटके उडण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे आता या दोघांमध्ये काय निर्णय होतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. त्याचबरोबर भाजपच्या मित्रपक्षांना देखील त्यांना जागा द्यायच्या असल्याने जागावाटपात लढाई होणार आहे. त्यामुळे भाजप कमी जागा लढवून शिवसेनेला जास्त जागा देण्याची संधी आत तरी दिसत नाही.

दरम्यान, भाजपच्या या निर्णयाने देशभरात विरोधकांमध्ये धडकी भरली असून भाजपला या निर्णयाचा मोठा फायदा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याचबरोबर अनेक राज्यांत येऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याने विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. त्याचबरोबर काही विरोधकांनी मोदी आणि अमित शहा यांच्या या निर्णयाचे स्वागत देखील केले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –