Drug Case : रकुल प्रीत सिंह आणि सारा अली खान हिच्यासह ड्रग्स प्रकरणात रियानं NCB च्या समोर घेतले अनेक मोठी नावं, प्रचंड खळबळ

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – सुशांत सिंह राजपूतशी संबंधित ड्रगच्या संबंधात रिया चक्रवर्तीच्या अटकेनंतर नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) बॉलिवूडमधील अनेक बड्या नावांचा शोध घेण्याची शक्यता आहे. रियाने चौकशीत अनेक मोठ्या नावांचा खुलासा केला आहे. रिपोर्ट्सनुसार, यात सारा अली खान आणि रकुलप्रीत सिंह या अभिनेत्रींचाही समावेश आहे.

एनसीबीकडे बॉलिवूडच्या २५ स्टार्सची यादी आहे, जे ड्रग्जच्या प्रकरणात सहभागी होऊ शकतात. एका वृत्तसंस्थेनुसार, या यादीतील तीन नावे सापडली आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, रिया चक्रवर्तीने चौकशीत सारा अली खान, रकुल प्रीत सिंह आणि डिझायनर सीमोन खंभाट्टा यांचे नाव घेतले आहे.

सारा अली खान, रकुलप्रीत सिंह आणि सीमोन एनसीबीच्या रडारवर आहेत. सारा अली खान आणि सुशांत सिंह राजपूत खासगी चार्टर्ड विमानातून बँकॉक ट्रिपवर गेले होते. त्याचवेळी सीमोनचे ड्रग्स व्हॉट्सऍप चॅट उघडकीस आले होते.

रियाने दिले २० पानांचे निवेदन
एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रियाने २० पानांचे निवेदन दिले आहे. यात तिने विशेषतः सारा, रकुल आणि सीमोन यांचे नाव घेतले आहे. मात्र रियाने सुरुवातीला नकार दिला की ती ड्रग्स घेत नाही, पण नंतर रियाने ते स्वीकारले.

रिया म्हणाली आहे की- ‘मी, सारा आणि रकुलप्रीत सुशांतबरोबर फिरायचो आणि ड्रग्ज घ्यायचो.’ सूत्रांच्या माहितीनुसार, एनसीबी सध्या ड्रग्ज घेणार्‍या ए, बी आणि सी यादी सेलिब्रिटींवर लक्ष केंद्रित करत आहे.

अनेक अँगलने होणार चौकशी
नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो या प्रकरणात अनेक अँगलने चौकशी करेल. पहिला अँगल डी कंपनीच्या माध्यमातून बॉलिवूडला वित्तपुरवठा होणे. त्यात सरकारवर टीका करणाऱ्या एका बड्या चित्रपट निर्मात्याच्या नावाचा समावेश आहे.

या चित्रपट निर्मात्यास डी कंपनीकडून पैसे मिळाल्याचे एनसीबीला समजले आहे. तर दुसर्‍या अँगलमध्ये त्या सेलेब्रिटींची चौकशी केली जाईल, ज्यांनी या सेलिब्रिटींना व्यसनाची सवय लावली. कोर्टाने रिया चक्रवर्तीचा जामीन अर्ज फेटाळला होता.