Artificial Kidney | ‘ब्लड प्रेशर’च्या सपोर्टवर चालणार ‘ही’ कृत्रिम किडनी, बंद होणार डायलिसिस आणि ट्रान्सप्लांटचे त्रास; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Artificial Kidney | संशोधकांनी एक अशी कृत्रिम किडनी (artificial kidney) तयार आहे जी इम्प्लांटेबल बायोआर्टिफिशियल किडनी (implantable bioartificial kidney) आहे. यामुळे डायलिसिस मशीन्स आणि ट्रान्सप्लांटसाठी दिर्घ प्रतिक्षा तसेच त्रासापासून सुटका होणार आहे.

हा किडनी प्रकल्प एक राष्ट्रीय संशोधन प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे नाव किडनीएक्स (KidneyX) असून त्याचे लक्ष्य किडनी फेलियरच्या उपचारासाठी सूक्ष्म, मेडिकल ट्रान्सप्लांट आणि बायोआर्टिफिशियल कृत्रिम किडनी तयार करणे आहे. किडनीएक्स अमेरिकन आरोग्य आणि मानवसेवा विभाग आणि अमेरिकन सोसायटी ऑफ नेफ्रोलॉजीमध्ये एक सार्वजनिक-खासगी भागीदारी आहे.

छोटा आहे डिव्हाईस
रिपोर्टनुसार किडनी प्रोजेक्टने आपल्या कृत्रिम किडनीमध्ये दोन महत्वाचे भाग हेमोफिल्टर आणि बायोरिअ‍ॅक्टर (hemofilter and bioreactor) ला जोडले. प्री-क्लिनिकल देखरेखीसाठी स्मार्टफोनच्या आकाराचे उपकरण यशस्वीपणे ट्रान्सप्लांट केले. (Artificial Kidney) मागील काही वर्षात द किडनी प्रोजेक्टने वेगवेगळ्या प्रयोगात हेमोफिल्टर आणि बायोरिअ‍ॅक्टरची यशस्वीपणे चाचणी केली. हेमोफिल्टर रक्तातून विषारी किंवा टाकाऊ घटक हटवते. तर बायोरिअ‍ॅक्टर रक्तात इलेक्ट्रोलाइट्स संतुलनासारखे कार्य करते.

ही कृत्रिम किडनी (Artificial Kidney) चांगले जीवन देईल, अनेक त्रासापासून मुक्ती देईल, रूग्णांना औषधांचे साईडइफेक्ट्स आणि आजारांपासून सुद्धा वाचवेल.
कृत्रिम मानवी किडनी पेशींना मदत करेल, इम्यून रिस्पॉन्स सुद्धा तिला बाहेरील पदार्थ समजून विरोध करणार नाही.
संशोधक म्हणाले, आता आम्हाला आणखी कठोर प्री-क्लिनिकल चाचणीसाठी तंत्रज्ञान आणखी प्रगत करावे लागेल.
जेणेकरून निकालामध्ये कोणत्याही प्रकारच्या चुकीला वाव राहणार नाही.

Web Title :- Artificial Kidney | first artificial kidney that would free people from dialysis and transplants runs on blood pressure

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Parambir Singh | ‘या’ प्रकरणात परमबीर सिंग यांना 21 ऑक्टोबरपर्यंत मोठा दिलासा; तूर्तास होणार नाही ‘ती’ कारवाई  

Pune Katraj Zoological Park | पुण्याच्या कात्रज प्राणिसंग्रहालयातील ‘प्रियदर्शनी’ वाघिणीनेन घेतला अखेरचा श्वास 

Vishwas Nangre Patil | विश्वास नांगरे पाटील यांच्या विरोधात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार; जाणून घ्या प्रकरण