कर्नाटकच्या रस्त्यावर अवतरला चक्‍क ‘अंतराळवीर’, कारण समजल्यावर तुम्हीही व्हाल ‘थक्‍क’ (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अंतराळवीराचे प्रत्येकालाच आकर्षण आहे. चंद्रावर गेलेला माणूस म्हणलं की सगळ्यांना लगेच निल आर्मस्ट्रॉंग आठवतो आणि त्या सोबतच आठवतात चंद्राचे फोटो, अंतराळवीराचा गणवेश आणि अंतराळवीर. मात्र कर्नाटकातील बंगळूरमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे.

बंगळूरमध्ये अंतराळवीर उतरल्याचे पहायला मिळाले आहे. अशा प्रकारचा एक व्हिडीओ जोरदार पद्धतीने व्हायरल होत आहे हा व्हिडीओ अगदी चंद्रावरून माणूस चालल्यासारखा आहे. मात्र हा व्हिडीओ बंगळूरमधील रस्त्यावरचा आहे.

कलाकार बादल नानजुंडास्वामी यांनी बंगळूरमधील रस्त्यांची अवस्था सगळ्यांच्या निदर्शनास येण्यासाठी ही नामी शक्कल लढवली आहे. स्वामी यांनी अंतराळवीराचा गणवेश परिधान केला आणि बंगळुरुच्या खड्ड्यांवरून फिरले; ते म्हणतात, “बंगळुरुमधील रस्त्यांची खराब अवस्था ही एक मोठी समस्या आहे. यामुळे सर्वसामान्यांना अपघातांना सामोरे जावे लागते म्हणूनच मी हा विषय प्रकाशात आणण्याचा प्रयत्न केला आहे.

अंतराळवीराला रस्त्यावर पाहून मात्र सर्वसामान्यांना आश्चर्याचा धक्का नक्कीच बसला असेल. मात्र सोशल मीडियामध्ये हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

तुळशीची पाने किडनी स्टोनवर गुणकारी, जाणून घ्या असेच ९ फायदे

शरीराला थंडावा देतात ‘हे’ पदार्थ, अवश्य करा यांचे सेवन, जाणून घ्या

देशातील युवा वर्ग होत आहे ह्रदयविकाराने त्रस्त, अशी घ्या काळजी

नैसर्गिक सौंदर्यासाठी ‘हे’ फेसपॅक वापरा, निस्तेज, कोरडा चेहरा होईल तजेलदार

काकडी खाल्ल्याने होतील ‘हे’ चमत्कारिक फायदे, तुम्हाला माहीत नसावेत

कोणत्या फळात किती पाणी, जाणून घ्‍या ; वजन कमी करण्यासही फायदेशीर

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like