सरकारी लुडबुडीला कलाकारच जबाबदार !

मुंबई: पोलिसनामा ऑनलाइन – गेल्या काही वर्षांच्याकालावधी पासून सकारची कला क्षेत्रात लुडबुड वाढली असून त्याला कलाकरच सर्वस्वी जबाबदार आहेत. केंद्र,राज्य सरकारकडून मिळणारा निधी, विविध लाभ, राजाश्रय तसेच सरकारकडून मिळणारी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कामे त्यांना हवी असतात. त्यामुळे हस्तक्षेप कितीही वाढला तरी कलाकार गप्प राहाणेच पसंत करतात. अशी टिका ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी केली आहे.

पीटीआय’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी सरकारवर जोरदार टीका केलीच पण कलाकारांच्या मिंधेपणाला तेच जबाबदार असल्याची बोचरी टीकाही केली. कलाकारांच्या मिंधेपणाचा फायदा सरकार उठवते. कलाकारांचे पंख छाटतात, त्यांचा आवाज बंद करतात. सरकारची हुकूमशाही मान्य करतात. सरकारविरोधात आवाज उठवायचा की सरकारविरोधात बोलायचे नाही, याचा पर्याय कलाकारांकडेच असतो.

नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टमधील माझे भाषण थांबवण्यात आले. त्यावेळी तिथे कला क्षेत्रातील मोठमोठे दिग्गज उपस्थित होते, पण भाषण थांबवणाऱ्याना कोणी मध्येच रोखले नाही. याला काय म्हणायचे, त्यांच्या बोलण्यात नाराजी दिसून आली.