27 कोटींना विकली गेली व्ही. एस. गायतोंडेंची ‘कलाकृती’, सर्वात महाग असलेल्या भारतीय ‘पेंटिंग’पैकी एक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – व्ही. एस. गायतोंडे यांनी १९८२ साली तयार केलेली एक अज्ञात कलाकृती ही आतापर्यंतच्या कोणत्याही भारतीय कलाकारांच्या पाच सर्वात महागड्या कलाकृतींपैकी  एक बनली आहे. सैफ्रॉन आर्टच्या मॉर्डन इंडियन आर्टवर लावलेल्या लिलावात गायतोंडे यांच्या कलाकृतीवर तब्बल २६.९ कोटींची बोली लावली गेली.

या ग्रीन ऑइल पेंटिंगने (तैलचित्र) कलाकारांची अचूकता आणि कल्पकता, स्वतंत्र कला तंत्र प्रदर्शित केले, ज्याचे मूल्य २० ते ३० कोटी रुपये एवढे अपेक्षित होते. या चित्राचा समावेश भारतातील गायतोंडेंच्या तीन सर्वात महागड्या कलाकृतींमध्येही करण्यात आला आहे.

अन्य महागड्या कलाकृती : त्याच वेळी, भूपेन कुमारची पेंटिंग ‘ट्रेड्समन’ (व्यापारी) ३.७२ कोटी रुपयांना विकली गेली आणि लिलावातली ही दोन नंबरची सर्वात महागडी पेंटिंग ठरली. ही चित्रकृती १९८६ मध्ये तयार केली गेली होती. वर्ष १९५८ मध्ये बनविलेले राम कुमार यांची पेंटिंग ‘कंपोजिशन’ (रचना) दोन कोटींना विकली गेली, जी लिलावात तिसऱ्या क्रमांकावर होती.

पहिल्या पाच कलाकृतींपैकी एक अशी शीर्षकहीन पेंटिंग्ज होती जी १९४० च्या दशकात केएच आरा यांनी तयार केली होती. मजुरांचा गट पत्ते खेळताना दाखविणारी ही कलाकृती आधार किंमतीपेक्षा चार पट किंमतीवर १.२ कोटी रुपयांना खरेदी केली गेली. २००७ मध्ये एस.एच. रझा यांनी बनविलेली ‘ओम’ ही भूमितीय कलाकृतीही त्याच्या मूळ किंमतीच्या दुप्पट दराने १.९२ कोटींवर विकली गेली.