निवडणुकांच्या तोंडावर अरूण गवळी जेलबाहेर येण्याची शक्यता 

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – गुन्हेगारी विश्वातील कुख्यात गुंड अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी उर्फ डॅडी सध्या तुरुंगात आहेत. डॅडी पुन्हा एकदा जेलबाहेर येण्याची शक्यता आहे. डॉन अरुण गवळीने संचित रजेसाठी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर नागपूर खंडपीठात पुढील सोमवारी म्हणजेच 25 मार्चला सुनावणी होणार आहे.

शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. अरुण गवळी सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. विशेष म्हणजे अरूण गवळी यांनी यापूर्वीही मुलाचे लग्न, आजारपण अशा कारणांमुळे दोन ते तीन वेळा जेलबाहेर आला आहे. आता पुन्हा बाहेर येण्यासाठी त्याने याचिका खंडपीठात दिली आहे.

दरम्यान, सध्या राज्यात निवडणुकांचे वातावरण आहे. त्यात अरूण गवळी सारख्या गुंडाला रजेनिमित्तर तुरुंगाबाहेर सोडणे किती योग्य आहे, हा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे नागपूर खंडपीठ डॉ. अरुण गवळीची संचित रजा मंजूर करते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Loading...
You might also like