मुलीचे लग्न लागताच अरुण गवळीला न्यायालयाचा दणका, दिले ‘हे’ आदेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कुख्यात गुंड अरुण गवळीच्या (डॅडी) मुलीचा विवाह सोहळा लॉकडाऊनमध्ये पार पडला. यानंतर आता गवळीच्या पॅरोलमध्ये वाढ करण्यास मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने नकार दिला आहे. न्यायालयाने अरुण गवळीला नवी मुंबईमधील तळोजा कारागृहात जाऊन सरेंडर करण्याचे आदेश दिले आहेत. अरुण गवळी पॅरोल वाढवून देण्यासाठी अर्ज केला होता. दरम्यान, आपण कोणतंही गैरकृत्य त्याचप्रमाणे लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केलं नसल्याचा युक्तीवाद केला. मात्र, न्यायालयाने चांगली वर्तवणूक किंवा नियमांच उल्लंघन न केल्याच्या धर्तीवर पॅरोल वाढवला जाऊ शकत नाही, असे बजावले.

तसेच पॅरोल वाढवण्यासाठी कोणतीही कायदेशीर तरतूद नसल्याचे खंडपीठाने नमूद केले. त्यामुळे अरुण गवळीला पुन्हा कारागृहात परतावं लागणार आहे. शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांदेकर यांच्या हत्येप्रकरणी ते नागपूर कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. पत्नी गंभीर आजारी असल्याच्या कारणामुळे गवळीला सुरुवातीला 45 दिवसांचा पॅरोल मंजूर करण्यात आला होता.

त्यानुसार त्याला 27 एप्रिल रोजी कारागृहात आत्मसमर्पण करायचे होते. परंतु, लॉकडाऊनमुळे उच्च न्यायालयाने त्याला पहिल्यांदा 10 मे पर्यंत मुदतवाढ दिली होती. त्यानंतर लॉकडाऊन लांबले. परिणामी न्यायालयाने गवळीच्या पॅरोलमध्ये दुसऱ्यांदा वाढ केली. गवळीला शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांदेकर यांच्या खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like