‘रामायण’च्या TV वरील प्रसारणानंतर ट्विटरवर आले अरूण गोविल, सर्वप्रथम केलं ‘हे’ ट्विट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील कोरोना व्हायरसचा धोका पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. लॉकडाऊनमध्ये लोकांच्या मनोरंजनासाठी पुन्हा एकदा दूरदर्शनवर रामानंद सागर यांच्या रामायणाचे प्रसारण केले जात आहे. टीव्ही कार्यक्रम ‘रामायण’ने सगळे रेकॉर्ड तोडले असून लोकं याला पसंती दर्शवत आहेत. ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिलच्या एका अहवालानुसार, ‘रामायण’ने मागच्या आठवड्यात चार कार्यक्रमात १७० मिलियन प्रेक्षकांचा सहभाग होता.

याच दम्यान रामायणातील भगवान श्रीराम यांची भूमिका करणारे अभिनेते अरुण गोविल हेही ट्विटरवर आपल्या चाहत्यांशी जोडले गेले आहेत. अरुण गोविल यांनी येताच पहिले ट्विट केले जे खूप व्हायरल होत आहे. अरुण गोविल यांनी लिहिले की, “अखेर मी ट्विटर जॉईन केले, जय श्री राम.” त्यांचे हे ट्विट खूप व्हायरल होत आहे आणि लोकं त्यावर कमेंट देखील करत आहेत. एकाने लिहिले की, तुमचे हे हास्य सगळ्या दुःखाला दूर करते, स्वागत आहे.’

https://twitter.com/ArunGovil_Ram/status/1246465192172482563