माजी अर्थमंत्री अरुण जेटलींची प्रकृती अतिशय ‘चिंता’जनक, अनेक नेत्यांची ‘एम्स’कडे ‘धाव’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भाजपाचे नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची प्रकृती अत्यंत नाजूक झाली आहे. त्यांची प्रकृती बिघडत असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवरून हटवून ईसीएमओ (एक्सट्राकॉर्पोरियल मेंब्रेन ऑक्सीजिनेशन) वर शिफ्ट करण्यात आले आहे. तज्ज्ञ डॉक्टरांचे एक पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. दरम्यान, आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एम्समध्ये येऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेत प्रकृतीची चौकशी केली. तर सायंकाळी सहाच्या सुमारास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एम्समध्ये पोहचले.

यापूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील जेटली यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील जेटली यांच्या कुटुंबियांची भेट घेतली होती. अरुण जेटली यांना ९ ऑगस्ट रोजी एम्समध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ६६ वर्षीय अरुण जेटली यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

अरुण जेटली यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे अथवा अन्य माहिती देणारे कोणतेही मेडिकल बुलेटिन प्रसिद्ध करण्यात आले नाही. प्रकृती ठिक नसल्याने अरुण जेटली यांनी २०१९ ची लोकसभा निवडणूक देखील लढवली नव्हती. १४ मे रोजी मूत्रपिंडावर शस्त्रक्रिया केल्याने रेल्वे मंत्री पीयुष गोयल यांनी अर्थमंत्रालयाचा कारभार सांभाळला होता. शनिवारपासून जेटलींना भेटण्यासाठी अनेक जण एम्समध्ये येत आहे. यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, आरोग्य मंत्री हर्षवर्धन आणि रेल्वे मंत्री पीयुष गोयल यांचा समावेश होता.

आरोग्यविषयक वृत्त