अरुण जेटली उपचार घेत असलेल्या ‘एम्स’ला ‘आग’, जेटलींना ‘ECMO’ मध्ये हलवलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भाजपचे वरिष्ठ नेता आणि माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांची प्रकृती सध्या अतंत्य चिंताजनक आहे. एम्स रुग्णालयाने त्यांची नाजूक प्रकृती पाहून त्यांना वेंटिलेटरवरुन काढून ईसीएमओ म्हणजेच एक्सट्रायकॉर्पोरियल मेंब्रेन ऑक्सिजनेशनवर शिफ्ट करण्यात आले आहे. परंतू नुकत्याच आलेल्या माहितीनुसार जेटली उपचार घेत असलेल्या दिल्लीतील एम्स रुग्णालयाला आग लागली आहे. आग विझवण्यासाठी आता ३४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

अरुण जेटली याच्या प्रकृतींची विचारपूस करण्यासाठी मागील दोन दिवसांपासून अनेक नेते भेट आहेत. शनिवारी सकाळी मायावती देखील त्यांना भेटण्यासाठी पोहचल्या होत्या. आज संध्याकाळी बिहारचे मुख्यमंत्री नीतिश कुमार हे देखील दिल्लीत पोहचले आहेत. संध्याकाळी पुन्हा एकदा अमित शाह यांनी देखील एम्समध्ये जाऊन जेटलींच्या प्रकृतीची महिती घेतली.

शुक्रवारी रामनाथ कोविंद यांनी देखील अरुण जेटलींची भेट घेतली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एम्समध्ये जाऊन जेटलींच्या कुटूंबियांची भेट घेतली. जेटलींवर ९ ऑगस्टपासून अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत आहेत. डॉक्टरांचा एक चमू त्यांच्या प्रकृतीकडे लक्ष देत आहेत.
अरुण जेटली यांना श्वसनाचाय होणारा त्रास यामुळे एम्समध्ये दाखल करण्यात आले. अजूनही रुग्णालयाने आरोग्य बुलेटिन मिडियाला दिलेले नाही.

२०१८ साली अरुण जेटली मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या तपासणीसाठी अमेरिकेत उपचार घेण्यासाठी गेले होते. १४ मे २०१८ ला त्यांचे मूत्रपिंड प्रत्यारोपण झाले होते. परंतू शस्त्रक्रिया करुन देखील ते त्या व्यधीने ग्रस्त होते. याशिवाय त्यांना मांडीचा कॅन्सर होता. या दोन्ही आजारामुळे ते अनेक दिवसांपासून त्रस्त होते. यासाठी ते दिल्लीत एम्स रुग्णालयात उपचारासाठी अनेकदा दाखल झाले होते. तसेच ते यावर उपचारासाठी अमेरिकेत देखील दाखल झाले होते. परंतू मांडीचा कॅन्सर आणि मूत्रपिंडाच्या समस्येमुळे त्यांची तब्येत खालावत चालली होती. यामुळे काही दिवसांपूर्वी त्यांना पुन्हा एकदा त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दिल्लीत एम्स रुग्णालयात दाखल केले होते.

आरोग्यविषयक वृत्त –