त्यावेळी ‘राजकारण’ नव्हतं, ‘या’ शस्त्रक्रियेमुळं अरूण जेटली आले ‘चर्चेत’

पोलीसनामा ऑनलाईन – भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे शनिवारी (ता. २४) दुपारी १२ वाजून ७ मिनिटांनी निधन झाले. वयाच्या 67 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अरुण जेटली यांना ९ ऑगस्टपासून नवी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) मध्ये दाखल केले गेले. मागील चार दशकांहून अधिक काळ राजकारणात सक्रिय होते. मात्र आरोग्याच्या कारणास्तव यावेळी नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात जाण्यास नकार दिला.

सुरवातीला जेटलींच्या आजाराबद्दल डॉक्टर स्पष्टपणे काहीही सांगू शकले नाहीत. त्यानंतर त्यांना सॉफ्ट टिशू सारकोमा नावाचा कर्करोग झाल्याचे समोर आले. या कारणास्तव त्यांना वारंवार श्वास घेण्यास त्रास होत असे. मधुमेहाने ग्रस्त असलेल्या जेटली यांनी काही वर्षांपूर्वी हृदय शस्त्रक्रिया आणि लठ्ठपणापासून मुक्त होण्यासाठी बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया केली होती. जेटली एका वेळी लठ्ठपणापासून मुक्त होण्यासाठी बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया केल्यामुळे चर्चेत आले होते.

बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया हा वजन कमी करण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. जेटलीनींही वजन कमी करण्यासाठी ही शस्त्रक्रिया करुन घेतली होती. त्याचे तीन प्रकार पडतात. पहिला प्रक्रार लॅप लॅंड, दुसरा स्लीव्ह गॅस्ट्रॅक्ट्रॉमी आणि तिसरा गॅस्ट्रिक बायपास शस्त्रक्रिया. या शस्त्रक्रिया लेप्रोस्कोपिक पद्धतीने केल्या जातात. लॅप बँड शस्त्रक्रियेनंतर एखाद्या व्यक्तीची खाण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात कमी होते. दुसऱ्या प्रकाराच्या शस्त्रक्रियेत स्लीव्ह गॅस्ट्रिकॉमीनंतर दर आठवड्यात दीड ते दोन किलो वजन कमी होऊ लागते. त्यानंतर साधारण बारा ते अठरा महिन्यांच्या कालावधीत ८० ते ८५ टक्के वजन कमी होते. तर तिसऱ्या प्रकारात गॅस्ट्रिक बायपासमध्ये पोट विभागले जाते आणि एक शेल्फ, बॉल आकाराचे शेल्फ तयार करण्यासाठी बाकी असते. या शस्त्रक्रियेनंतर अन्नपचन उशिरा होते. भूक वाढविणारा ‘ग्रेहलीन’ संप्रेरक तयार होण्याचे थांबवते. यामुळे शरीरात साठलेल्या चरबीचे ऊर्जेत रुपांतर होते. परिणामी वजन वेगाने कमी होते.

या प्रक्रियेत वजन वाढविणारे हार्मोन काढून टाकले जातात. ज्यामुळे सामान्य गतीने व्यक्तीचे वजन कमी होऊ लागते. बॅरिएट्रिक शस्त्रक्रियेनंतर व्यक्तीला भूक कमी लागते. ज्यामुळे एका वर्षात ५० ते ६० किलो वजन कमी होते. खरेतर वजन कमी करण्यासाठी करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रिया धोकादायक असतात. पण वजन करणाऱ्या इतर शस्त्रक्रियेच्या तुलनेत बॅरिएट्रिक शस्त्रक्रियेचा धोका कमी असतो. हे करण्यासाठी लॅपरोस्कोपिक पद्धत वापरली जाते, ज्यामुळे व्यक्तीमध्ये वेदना कमी होते.

आरोग्यविषयक वृत्त –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like