अटल बिहारी वाजपेयींपासून नरेंद्र मोदींपर्यंत सर्वांचेच आवडते होते अरूण जेटली, जाणून घ्या राजकीय प्रवास

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने 9 ऑगस्ट रोजी अरुण जेटली दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल झाले होते. आज अखेर त्यांनी आपला शेवटचा श्वास घेतला. नोटबंदी आणि जीएसटी यांसारखे धाडसी निर्णय जेटलींनी आपल्या कारकिर्दीत घेतले होते.. दिल्लीतील एम्स रुग्णालयात दुपारी 12.07 मिनिटांनी जेटलींनी अखेरचा श्वास घेतला.

अरुण जेटली यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरवात महाविद्यालयातूनच केली होती. जेटली १९७४ मध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (ABVP) चे दिल्लीतील अध्यक्ष होते.
IN PICS: अटल बिहारी से लेकर मोदी के चहेते थे अरुण जेटली, ऐसा था उनका राजनीतिक सफर
यानांतर १९९९ मध्ये त्यांना पहिली मोठी जबाबदारी मिळाली त्यांना बीजेपीचा प्रवक्ता बनवण्यात आले होते. याच वर्षी जेटली यांना अटलबिहारी यांच्या सरकारमध्ये सूचना आणि प्रसारण राज्यमंत्र्याची जबाबदारी देण्यात आली.
IN PICS: अटल बिहारी से लेकर मोदी के चहेते थे अरुण जेटली, ऐसा था उनका राजनीतिक सफर
२३ जुलै २००० मध्ये राम जेठमलानी यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे जेटली यांना न्याय आणि कंपनी बाबतच्या केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपदाचा अतिरिक्त भारही देण्यात आला.
IN PICS: अटल बिहारी से लेकर मोदी के चहेते थे अरुण जेटली, ऐसा था उनका राजनीतिक सफर
जेटली याना २९ जानेवारी २००३ मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले. मे २००४ मध्ये जेटली पार्टीचे महासचिव पदी गेले. २००९ मध्ये जेटली यांना राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपद देण्यात आले.
IN PICS: अटल बिहारी से लेकर मोदी के चहेते थे अरुण जेटली, ऐसा था उनका राजनीतिक सफर
अरुण जेटली यांचे महत्व पार्टीमध्ये तेव्हा दिसून आले जेव्हा २०१४ मध्ये जेटली हे लोकसभेची निवडणूक हरले होते तरीही त्यांना केंद्रात कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले होते. अमृतसरमधील काँग्रेसच्या अमरिंदर सिंह यांनी जेटलींचा पराभव केला होता.
IN PICS: अटल बिहारी से लेकर मोदी के चहेते थे अरुण जेटली, ऐसा था उनका राजनीतिक सफर
२०१८ साली पुन्हा एकदा जेटलींनी निवड राज्यसभेसाठी करण्यात आली आणि केंद्रात पुन्हा भाजपची सत्ता आल्यावर त्यांना मंत्रिपद दिले जाणार असल्याचे निश्चित मानले जात होते.
IN PICS: अटल बिहारी से लेकर मोदी के चहेते थे अरुण जेटली, ऐसा था उनका राजनीतिक सफर
देशात पुन्हा एकदा मोदींचे सरकार येताच जेटली यांनी मोदींना पत्र लिहिले आणि त्यात मला तब्बेतीची काळजी घ्यायची असल्यामुळे कोणतेही मंत्रिपद नको असे सांगितले.
IN PICS: अटल बिहारी से लेकर मोदी के चहेते थे अरुण जेटली, ऐसा था उनका राजनीतिक सफर
अर्थमंत्री राहिलेल्या जेटलींनी मंत्रिपद स्वीकारण्यास नकार दिल्यावर अर्थमंत्रीपदाची जबाबदारी निर्मला सीतारामन यांच्यावर देण्यात आली.

आरोग्यविषयक वृत्त

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like