अरुण जेटली यांनी केली इंदिरा गांधींची हिटलरशी तुलना

नवी दिल्ली: वृत्तसंस्था

आजच्या दिवशी १९७५ साली माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली होती .आज देशात भाजपचे सरकार आहे. आजचा दिवस भाजपाद्वारे काळा दिवस म्हणून पळला जात आहे. असे असतानाच केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची तुलना चक्क हुकूमशहा हिटलरशी केली आहे.

आपल्या ट्विटर अकाउंट वरून केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांची थेट हुकूमशहा हिटलरशी तुलना केली आहे. अशा स्वरूपाचे ट्विट त्यांनी आपल्या खासगी ट्विट वर केले आहे. त्यामुळे आता काँग्रेस आणि जेटली यांच्यात जुंपण्याची चिन्हे दिसत आहेत.

काय आहे ट्विट

त्यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हंटले आहे की, ‘इंदिरा गांधी यांनी मुलभूत अधिकारांची पायमल्ली करत आणीबाणी लागू केली होती. हिटलर आणि इंदिरा गांधी यांनी लोकशाहीला हुकूमशाहीत बदलण्यासाठी संविधानाचा वापर केला होता,’ अशी टीका जेटली यांनी ट्विटमध्ये केली आहे.

आता अरुण जेटली यांच्या या वादग्रस्त ट्विट नंतर सोशल मीडियावर या ट्विटची जोरदार चर्चा आहे. काही जणांकडून या ट्विटला विरोधी प्रतिक्रिया उमटत आहेत.