‘पंतप्रधान’ पदासाठी नरेंद्र मोदींचं नाव जेटलींनीच सुचवलं होतं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशाचे माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे प्रदीर्घ आजाराने आज १२.०७ च्या सुमारास निधन झाले. ९ ऑगस्टपासून ते दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार घेत होते. बऱ्याच दिवसांपासून त्यांना किडनीचा त्रास जाणवत होता. बऱ्याच दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते मात्र कोणत्याही उपचाराला त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नव्हता. आज अखेर त्यांनी एम्स रुग्णालयात ६७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावे असे सर्वात आधी सुचवणारे अरुण जेटलीच होते. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर केंद्रातील प्रत्येक धोरणाला जेटलींनी पाठींबा दिला. विेशेषता आर्थिक धोरण आणि निर्णयात ते ठाम पणे सरकारच्या पाठीशी उभे राहिले. मोदी सरकारच्या आर्थिक धोरणात त्याचा मोठा वाटा राहिला.

2014 साली सत्ता स्थापन करणाऱ्या मोदी सरकारमध्ये त्यांना अर्थमंत्री पद देण्यात आले होते. परंतू 2019 च्या लोकसभा निवडणूकीआधीपासूनच त्यांची प्रकृती बिघडली होती. 2018 साली त्यांच्यावर अमेरिकेत किडनी संबंधित शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर ते भारतात परतले होते. परंतू प्रकृतीच्या कारणाने ते निवडणूकीत सहभागी होऊ शकले नाहीत. तसेच त्यांनी मोदी सरकार 2 मध्ये कोणताही पदभार स्वीकारला नाही.

आरोग्यविषयक वृत्त –