‘अमेरिका घुसू शकते तर भारत का नाही ?’ : अरूण जेटली

दिल्ली : वृत्तसंस्था – लादेनला मारलं जातं तर काहीही शक्य नाही असं वक्तव्य केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी केलं आहे. इतकेच नाही तर, अमेरिका घुसून मारू शकतं तर भारत का नाही असंही ते म्हणाले. भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये असणारे जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी अड्डे उध्वस्त करत जैशचे अनेक मोठे कमांडर तसेच मसूद अजहर याचे दोन भाऊ आणि मेहुणा यांचा खात्मा केला आहे. या मुद्द्याला धरून अरूण जेटलींनी हे विधान केलं आहे. दिल्लीमध्ये पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी त्यांनी हे विधान केलं आहे. जर लादेनला मारलं जाऊ शकतं तर मग मसूदला का नाही असं सूचक विधान त्यांनी केलं आहे.
भारताने केलेल्या हवाई हल्ल्याचे जेटली यांनी अतिशय धाडसी समर्थन केले आहे. दरम्यान दिल्लीमध्ये पत्रकारांशी बोलताना अरूण जेटली म्हणाले की, “अमेरिकेने पाकिस्तानच्या अबोटाबादमध्ये घुसून लादेनचा खात्मा केला. अमेरिका जर पाकिस्तानमध्ये घुसून लादेनला मारू शकते तर भारत का नाही” असं सूचक विधान अरूण जेटली यांनी केलं आहे. जर अमेरिका पाकिस्तानमध्ये घुसून लादेनला मारू शकते तर भारत पाकिस्तानमध्ये घुसून मसूद अजहरला का नाही मारू शकत असं त्यांनी आपल्या विधानातून सुचवलं आहे.
पाकिस्तानच्या अबोटाबादमध्ये घुसून अमेरिकेने लादेनला संपवलं होतं. दुसऱ्या दिवशी पाकिस्तानच्या घोषणेनंतर जगाला याबाबत माहिती झाली. दरम्यान अरूण जेटली यांनी केलेल्या वक्तव्यानंतर जे अबोटाबादमध्ये झालं ते लाहोरमध्ये होणार का असाही प्रश्न आता उपस्थित होताना दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या –

भारताची दोन विमानं पाडली, एक वैमानिक ताब्यात, पाकचा दावा

काल घुसून मारलं अन् आज तोंड फोडलं ; Airstrike भारतानं पाकिस्तानचं F-16 विमान पाडलं 

पाकिस्तानी विमानं भारतीय हद्दीत शिरली ; बाॅम्ब टाकल्याची शक्यता ? 

धक्कादायक… #AirStrike नंतर भारतीय वायुदलाच्या ‘त्या’ विंग कमांडरची आत्महत्या 

भारताची 2 विमानं पाडली, 1 वैमानिक ताब्यात, पाकचा दावा