जेटलींनी तोडलं होतं ‘मोदी-शाह’ यांच्या विरोधातील विरोधी पक्षाचं कायद्याच्या षडयंत्राचं ‘चक्रव्यूह’

पोलीसनामा ऑनलाईन टीम – आज दुपारी १२.०७ वाजता देशाचे माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे दिल्लीतील एम्समध्ये निधन झाले आहे. अरुण जेटली मागच्या अनेक दिवसांपासून आजारी होते. त्यांनी दिल्ली मधील एम्समध्ये अखेरचा श्वास घेतला.

दिनांक २७ सप्टेंबर २०१० रोजी तत्कालीन पंतप्रधान मनोहन सिंग यांना अरुण जेटली यांनी एक पत्र लिहिले होते. ते पात्र आजही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकेतस्थळावर (narendramodi.in) येथे उपलब्ध आहे. ज्यामध्ये जेटली यांनी तपास यंत्रणांचा गैरवापर करून मोदी आणि अमित शहा यांना फसवण्यात येत असल्यावरून हल्ला चढवला होता. अरुण जेटली यांचे हे पत्र १ ऑक्टोबर २०१३ रोजी नमो वेबसाइटवर प्रसिद्ध झाले होते. या पत्रात अरुण जेटली यांनी सोहराबुद्दीन, इशरत जहां, तुलशी प्रजापती एनकाउंटर प्रकरणात तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याविरूद्ध खोटे खटले दाखल केल्याबद्दल लिहिलेले आहे. अरुण जेटली यांनी असा आरोप केला होता की, मोदी-शहा यांना फसवण्यासाठी आयपीएस संजीव भट्ट यांचा वापर करत आहेत.

मोदी – शहांच्या पाठीशी कायदेशीर ढाल म्हणून उभे राहिले

अरुण जेटली हे भाजपमधील एकमेव असे व्यक्ती होते. जे मोदी आणि शाह यांच्या वाईट दिवसांमध्ये सुद्धा त्यांच्यासोबत उभे राहिले. कदाचीत त्यामुळेच जेव्हा नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्रीही नव्हते. तेव्हा पासून अरुण जेटली त्यांचे मित्र होते. २०१० मध्ये, केंद्रात यूपीए सरकार अस्तित्वात असताना, २००५ मध्ये गुजरातमधील सोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरणात अमित शाह यांना तुरूंगात जावे लागले. या प्रकरणात जरी, सुप्रसिद्ध वकील राम जेठमलानी हे अमित शहांच्या वतीने खटला लढवत असले तरी, त्यांच्या बचावासाठी महत्त्वपूर्ण कायदेशीर सल्ला देण्याची व्यवस्था जेटलीच करत होते. गोध्रा दंगलीने घेरलेल्या नरेंद्र मोदी आणि कथित बनावट चकमकीप्रकरणी चौकशीला सामोरे जात असलेल्या अमित शहा यांना कायदेशीर युक्तिवादाची ढाल देवून जेटलीच त्यांच्या पाठीशी उभे राहिले होते.

जेटलींनी भेदले होते कायदेशीर चक्रव्यूह

२००२ च्या गोध्रा दंगलीच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या एसआयटीकडून नरेंद्र मोदी यांना क्लीन चिट देण्यात आली होती. त्याचवेळी सीबीआयच्या तपासाला सामोरे जाणारे अमित शहा यांनाही नंतर सोहराबुद्दीन शेख चकमकी प्रकरणात निर्दोष सोडण्यात आले. अरुण जेटली यांनी विरोधकांचे कायदेशीर चक्रव्यूह अचूक भेदले होते. राज्यसभेत विरोधी पक्षनेते म्हणून असताना त्यांनी सभागृहातून माध्यमांना दमन दडपशाही च्या विरोधात आवाज उठविला होता.

अशी वाढत गेली मोदींशी जवळीक

जरी मोदी आणि अरुण जेटली यांची ओळख फार जुनी असली तरी १९९८ पासून ते ऐकमेकांच्या अधिक जवळ आले. नरेंद्र मोदी जेव्हा भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून दिल्लीत आले. तेव्हा त्यांच्या आगमनानंतर लवकरच अरुण जेटली हे राष्ट्रीय प्रवक्तेही झाले. दोन्ही नेत्यांमध्ये एक गोष्ट सामान होती ती म्हणजे दोघांनीहि कोणतीही निवडणूक लढवली नव्हती. तथापि, वाजपेयी सरकारमध्ये मंत्री झाल्यानंतर अरुण जेटली गुजरातमधूनच राज्यसभेवर गेले. या नंतर काही काळातच गुजरातला भूकंपाचा तीव्र झटका बसला. तेव्हा केशूभाई पटेल यांना बाजूला सारून नरेंद्र मोदी यांना गुजरातचे मुख्यमंत्री बनवले गेले होते.

२००२ च्या गोध्रा दंगलीनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या वेळी अरुण जेटली यांना राज्य प्रभारी म्हणून दिल्लीहून गुजरातला पाठविण्यात आले होते. असे म्हटले जाते की, मोदींशी चांगले संबंध असल्यामुळेच पक्ष नेतृत्वाने जेटलींना गुजरातला पाठवले गेले होते. जेणेकरून दोन नेत्यांमध्ये चांगला समन्वय होऊन विधानसभा निवडणुकीत पक्षाला फायदा होईल. अखेर हेच घडले, २००२ च्या विधानसभा निवडणुकीत मोदींचे नेतृत्व आणि जेटलींच्या प्रभावी निवडणूक व्यवस्थापनाने भाजपाला सत्ता मिळवून दिली.

असं म्हटलं की, गुजरातमध्ये जेव्हा गोध्रा दंगल सुरू झाली होती. तेव्हा वाजपेयी नरेंद्र मोदींना मुख्यमंत्री पदावरून काढून टाकण्याच्या बाजूने होते. त्यानंतर गोव्यात झालेल्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत ही कारवाई होणार होती. परंतु जेटलींनीच अडवाणी यांच्यासमवेत पक्षाच्या बहुतेक नेत्यांना मोदींच्या बाजूने उभे राहण्यासाठी जेटलींनी तयार केले होते. बैठकीत वाजपेयींनी पाहिले की, पक्षाचे नेते मोदींच्या बाजूने आहेत. त्यांना आपले पाय मागे खेचावे लागले. या बैठकीच्या एक दिवसानंतर अरुण जेटली अहमदाबादला गेले आणि नरेंद्र मोदींना भेटले. यानंतरच दोघांमधील संबंध वृद्धिंगत होत गेले.

आरोग्यविषयक वृत्त –