Arun Lal Second Marriage | भारताच्या ‘या’ माजी क्रिकेटपटूचं दुसऱ्यांदा शुभमंगल सावधान; 28 वर्षांनी लहान असणाऱ्या मुलीसोबत बांधली लगीनगाठ !

कोलकाता : वृत्तसंस्था – Arun Lal Second Marriage | भारताचे माजी क्रिकेटपटू आणि बंगालच्या रणजी संघाचे प्रशिक्षक अरुण लाल (Arun Lal second marriage) दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकले आहेत. अरूण लाल यांनी त्यांच्यापेक्षा तब्बल 28 वर्षांनी लहान असणाऱ्या कोलकाताच्या बुलबुल साहा (Bulbul Saha) यांच्यासोबत लग्न केलं आहे.

 

अरूण लाल आणि बुलबुल साहा बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना ओळखत होते. अरूण यांनी त्यांच्या पहिल्या पत्नीच्या इच्छेनेच दुसऱ्यांदा लग्न केलं आहे. दोघांनी एकमेकांच्या सहमतीने घटस्फोट घेतला आहे. पहिल्या पत्नीचं नाव रीना असून त्या दीर्घकाळापासून आजारी आहेत.

 

अरूण लाल यांनी लग्न केलेल्या बुलबुल साहा (Bulbul Saha Teacher) या पेशाने शिक्षिका आहेत.
कोलकाता (Kolkata) येथील एका शाळेमध्ये त्या शिकवतात. सोशल मीडियावर त्यांच्या हळदीचे फोटो व्हायरल झाले होते.
त्यांच्यापेक्षा 28 वर्षाने लहान असणाऱ्या मुलीसोबत त्यांनी विवाह केल्यामुळे अरूण लाल चर्चेत आले आहेत.

 

अरूण लाल आता बंगाल टीमचे (Bengal Cricket Team) कोच आहेत.
त्यांच्या कार्यकाळामध्ये बंगालची टीम पहिल्यांदाच 2020 मध्ये अंतिम फेरीमध्ये (Final) गेली होती.
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये अरुण लाल यांनी 46.94 च्या सरासरीने 10421 धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांच्या नावावर 30 शतक आणि 43 अर्धशतक आहेत.

 

दरम्यान, 1982 ते 1989 या काळात 16 कसोटी सामन्यात त्यांनी फक्त 729 धावा केल्या.
एकदिवसीय सामन्यात त्यांची सर्वाधिक धावसंख्या 51 होती. आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्यांना फारशी चांगली कामगिरी करता आली नाही.

 

Web Title :- Arun Lal Second Marriage | arun lal second marriage with bulbul saha at the age of 66 photos goes viral arun lal second marriage

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा