कोकण विभाग पत्रकार संघटनेच्या उपाध्यक्षपदी अरुण ठाकरे यांची निवड

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  पोलीस नामा मुरबाड रिपोर्टर अरुण ठाकरे; कोकण विभाग पत्रकार संघटना मुरबाड तालुका सर्वसाधारण सभा मुरबाड शासकीय शिवनेरी विसरामग्रह पीडब्ल्यूडी रेस्ट हाउस येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी संघांचे ठाणे जिल्हाध्यक्ष शामकांत पतंगराव,
ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष जगन्नाथ गायकर,प्रदेश सदस्य श्याम राऊत,ज्येष्ठ पत्रकार सुधीर भाऊ पोद्दार, ज्येष्ठ पत्रकार मुरली अण्णा दळवी, पत्रकार अशोक मोहिते, किशोर गायकवाड आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

यावेळी मुरबाड तालुका उपाध्यक्षपदी अरुण ठाकरे व जीवन शिंदे यांची निवड करण्यात आली तर सुरेश भालेराव सरचिटणीस,रवींद्र केबारी कार्याध्यक्ष,गीतेश पवार खजिनदार,अनंता घागस जिल्हा सदस्य,अशोक मोहिते तालुका सल्लागार निवड करणयात अली असून तालुक्यातील अनेक पत्रकारांनी संघाचे सवस्थापक अध्यक्ष संजय हंडोरे यांचे काम पाहता प्रवेश केला.

यानिमित्ताने मुरबाड तालुक्याच्या वतीने कार्य अहवाल सादर करून आदी संघटनात्मक विषयावर चर्चा करण्यात आली. व संघटनेच्या वतीने कोकण विभाग पत्रकार संघ ठाणे जिल्हा आयोजित ठाणें जिल्ह्यातील २०२१ मध्ये झालेल्या बिनविरोध ग्रामपंचायती सरपंच,उपसरपंच यांचा जाहिर सत्कार आदर्श सरपंच मा.भास्करराव पेरे पाटील यांच्या शुभ हस्ते शहापूर येथे दिंनाक २६/०२/२०२१ जीवन गौरव पुरस्काराचे सन्मान होणार असल्याची माहिती मुरबाड तालुका अध्यक्ष शेखर भोईर,ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष जगन्नाथ गायकर यांनी माहीती दिली.

संघाच्या वतीने लवकरच विविध उपक्रम राबविण्यात येणार असून दरम्यान, संघटना हि नेहमी प्रत्येक पदाधिकारी, सदस्य यांच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहते असे जेष्ठ पत्रकार मुरलीधर दळवी यांनी मार्गदर्शन करतांना म्हणाले सभेचे प्रास्ताविक मुरबाड तालुका अध्यक्ष शेखर भोईर यांनी केले.