कोल्हापुर मधून डॉ.अरुणा माळी लोकसभेच्या रिंगणात 

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर मतदार संघातून कोणाची उमेदवारी घोषित होणार याबाबत उत्सुकता आहे. शिवसेनेकडून प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या नावाची चर्चा आहे तसेच राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक हे देखील लोकसभेच्या रिंगणात आहेत,अशी चर्चा असताना आता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कोल्हापूर मतदार संघातून डॉक्टर अरुणा मोहन माळी निवडणूक लढवणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

यावेळी वंचित बहुजन आघाडीकडून राज्यातील सर्व जागा लढवणार असून हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची जागा आहे. लवकरच घोषित करू अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय प्रवक्ते लक्ष्मण माने यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले “प्रस्थापितांच्या विरोधात वंचित विकास आघाडी स्थापन केली आहे आघाडीत जात – धर्म न पाहता उमेदवारी दिली जाते. महाराष्ट्रातील सर्व 48 जागा आम्ही लढवणार असून काही उमेदवारांची घोषणा केली आहे तर काही जागा लवकरच घोषित करू. कोल्हापूर मतदारसंघातून डॉक्टर अरुण माळी उमेदवार असतील”.

या पत्रकार परिषदेला वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष अस्लम मुल्ला सांगली जिल्हा अध्यक्ष नामदेव करगने, प्रिया कांबळे, इंग्रजीत कांबळे, सुशील कुमार कोल्हटकर हे उपस्थित होते.