1 जानेवारीपासून ‘हे’ सरकार देणार लग्नामध्ये 1 तोळा सोनं, जाणून घ्या

गुवाहाटी : वृत्तसंस्था – 1 जानेवारीपासून आसाम सरकारने कमीत कमी 10 वी पर्यंत शिक्षण झालेल्या आणि आपल्या विवाहानंतर नोंदणी करणाऱ्या प्रत्येक नववधूला 10 ग्रॅम सोन्याची भेट मिळणार आहे, असे घोषित केले आहे. सरकारने अरुंधती सुवर्ण योजनेची घोषणा मागील वर्षी केली होती. सरकारने या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी ठेवल्या आहेत.

हे करावे लागेल –
अरुंधती सुवर्ण योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी नववधूच्या कुटूबांचे वार्षिक उत्पन्न 5 लाखापेक्षा कमी असावे. या योजनेच्या लाभ मुलीच्या पहिल्या लग्नासाठीच मिळेल. नववधूला विवाहची नोंदणी स्पेशल मॅरेज अ‍ॅक्ट 1954 च्या अंतर्गत करावी लागेल.

बँकेत जमा होणार 30 हजार रुपये –
अरुंधती सुवर्ण योजनेअंतर्गत सोनं खऱ्या स्वरुपात मिळणार नाही. लग्नानंतर रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशननंतर 30,000 रुपये वधुच्या बँक खात्यात जमा होतील. यानंतर सोन्याच्या खरेदीची पावती जमा करावी लागेल. या पैशांचा वापर इतर कोणत्याही उद्देशाने करता येणार नाही.

10 ग्रॅम सोन्यासाठी 30,000 रुपये ही रक्कम पूर्ण वर्षाच्या सोन्याच्या भावाच्या सरासरीने निश्चित करण्यात आली आहे. विवाहाची नोंदणी डिप्युटी कमिशनरच्या कार्यालयाशिवाय सर्कल ऑफिसमध्ये करण्याची परवानगी देण्यात आली आहे. अरुंधती सुवर्ण योजनेमुळे सरकारी तिजोरीवर जवळपास 800 कोटी रुपयांचा भार पडणार आहे. आसाम सरकारने सध्याच्या आर्थिक वर्षात या योजनेवर तीन महिन्यांसाठी 300 कोटींचा निधी ठेवला आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/