#Video : भर रॅलीत अरविंद केजरीवाल यांच्या श्रीमुखात लगावली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची प्रचार रॅली सुरु असताना अचानक एका तरुणाने भर रॅलीत त्यांना कानशिलात लगावले आहे. हा तरुण अरविंद केरीवाल यांच्यावर भडकला होता. ही घटना घडल्यानंतर मात्र पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले आहे. दरम्यान यापुर्वी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्यावेळी देखील त्यांच्या कानशिलात लगावण्यात आली होती.

नक्की काय घडले
अरविंद केजरीवाल हे एका जीप मध्ये उभे होते.  त्यांची प्रचार रॅली चालली होती. त्यांच्यासोबाबत त्यांचे अनेक कार्यकर्ते देखील जीपमध्ये उपस्थित होते. या रॅलीदरम्यान ते नागरिकांना हात उंचावून अभिवादन करीत होते. त्याचवेळी अचानक एक लाल रंगाचा शर्ट घातलेला तरुण पुढे आला आणि काही न कळताच या तरुणाने केजरीवाल यांच्या कानशिलात लगावली. त्यानंतर केजरीवाल यांच्या समर्थकांनी ताबडतोब त्याला पकडले आणि त्याला पोलिसांच्या हाती दिले.

केजरीवाल यांच्यासोबतचे यापूर्वीच्या घटना
केजरीवाल यांच्यावर याआधीही अशा प्रकारचा हल्ला झालेला आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणूकीत केजरीवाल वाराणसीतून नरेंद्र मोदी यांच्या विरोधात उभे होते. त्यावेळीही प्रचारादरम्यान एका व्यक्तीने त्यांच्या कानशीलात लगावली होती. तसेच आप नेते योगेंद्र यादव यांनाही काळे फासण्यात आले होते.

हार्दिक पटेल यांच्या कानशिलात
काही दिवसांपूर्वी गुजरातच्या सुरेंद्र नगरमध्ये काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांच्या कानशिलात लगावली होती. ते जाहिर सभेत भाषण करत असताना हा प्रकार घडला होता . एक अज्ञात व्यक्ती स्टेजवर आला आणि त्याने हार्दिक पटेल यांच्या कानाशिलात लगावली होती. या सभेचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर या व्यक्तीला कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली होती.