2022 मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका AAP लढवणार, अरविंद केजरीवाल यांनी केली घोषणा

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – आम आदमी पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. मंगळवारी त्यांनी याची घोषणा केली. यूपीमध्ये सन 2022 मध्ये विधानसभेसाठी निवडणुका होणार आहेत. ते म्हणाले की, लोक चळवळीच्या माध्यमातून त्यांनी 8 वर्षांपूर्वी पक्ष स्थापन केला आणि 3 वेळा दिल्लीत सरकार स्थापन करण्यात त्यांना यश आले. सीएम केजरीवाल म्हणाले की, याशिवाय पंजाबमध्ये त्यांच्या पक्षाने मुख्य विरोधी पक्षाचीही भूमिका बजावली.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, उत्तर प्रदेशमध्ये अनेक पक्षांचे सरकार आले आणि सर्वांनी आपले घर भरण्याचे काम केले. दरम्यान, उत्तर प्रदेशातून बरेच लोक आले होते ज्यांनी असे म्हटले होते की, आपने राज्यात विधानसभा निवडणुका लढवाव्यात. उत्तर प्रदेशातील लोकांना प्रत्येक कामासाठी दिल्लीत का यावं लागलं असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कानपूरच्या मुलांना चांगल्या कॉलेजसाठी दिल्लीत का यावं लागलं? भारतातील सर्वात मोठे राज्य विकसित राज्य का होऊ शकले नाही?

अरविंद केजरीवाल म्हणाले की, उत्तर प्रदेशात प्रत्येकाचे सरकार स्थापन झाले आहे. अशा परिस्थितीत तेथील जनता आता आम आदमी पक्षावर विश्वास ठेवेल. ते म्हणाले की, यूपीमध्ये मोहल्ला क्लिनिक का बांधता येत नाही? आपण चांगली क्लॅग का तयार करू शकत नाही? भाजप सरकारवर हल्ला बोलताना केजरीवाल म्हणाले की, महिलांवर होणारे बलात्कार का थांबत नाहीत.