Arvind Kejriwal | गुजरातमध्ये भाजप-काँग्रेसचे ‘ILU – ILU’, विलीन होणार; CM अरविंद केजरीवालांचा मोठा दावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Arvind Kejriwal | गुजरात काँग्रेस (Congress) लवकरच गुजरात भाजपमध्ये (BJP) विलीन होईल, अशी टीका दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (Aam Aadmi Party) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी केली आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी सध्या आम आदमी पार्टी (AAP) तयारी करत आहे.

 

केजरीवाल (Arvind Kejriwal) म्हणाले की, गुजरात निवडणूक आप आणि भाजप यांच्यात होणार असून गुजरात काँग्रेस लवकरच गुजरात भाजपमध्ये विलीन होईल. भाजप-काँग्रेसचे ईलू-ईलू संपणार आहे. याच वेळी एकीकडे भाजपचे ’27 वर्षांचे कुशासन’ आहे. तर दुसरीकडे आपचे ’नवे राजकारण’ आहे.

 

आम आदमी पार्टीने गुजरात विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections) पार्श्वभूमीवर गुजरातच्या जनतेला विविध सेवा मोफत देण्याची आश्वासने देण्यास सुरूवात केली आहे. रविवारी गुजरातमधील आरोग्य सेवा सुधारण्याबाबत आणि मोफत वीज देण्याबाबत केजरीवाल यांनी अनेक आश्वासने दिली.

 

केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी म्हटले की,
पंजाबमध्ये जवळपास 25 लाख घरांना नुकतेच ’शून्य’ वीज बिल आले आहे आणि दिल्लीतील अनेक लोकांनाही अशीच सुविधा मिळत आहे.
आमचे पहिले वचन विजेसंदर्भात आहे. गुजरातमधील लोक वीजबिलाच्याबाबतीत अत्यंत त्रस्त झाले आहेत.

 

गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी एक ट्विट केले होते.
यात त्यांनी म्हटले होते की, आम आदमी पक्षाचा गुजरातमध्ये वेगाने विस्तार होतोय.
यामुळे भाजपमध्ये अत्यंत घबराट निर्माण झाली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना गुजरातमध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून घोषित करणार आहे, हे सत्य आहे का ?
भूपेंद्रभाई पटेल (Bhupendrabhai Patel) यांच्या कामावर भाजपही नाराज आहे ?

 

Web Title : – Arvind Kejriwal | ilu ilu going on in gujarat bjp congress soon to merge kejriwals big claim

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा