‘इथं’ मिळतोय अर्ध्यापेक्षा कमी किंमतीत कांदा, सरकारचा निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीसह देशातील सर्वच भागात कांद्याचे भाव गगनाला भिडले आहेत. दिल्लीत त्याचे दर ६० ते ८० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. कांद्याच्या भावापासून दिल्लीतील लोकांना दिलासा देण्यासाठी दिल्ली सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सरकार मोबाईल व्हॅनमधून २४ रुपये प्रतिकिलो दराने कांद्याची विक्री करेल, असे या निर्णयात म्हटले आहे. त्यासाठी निविदा देखील काढण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज (सोमवारी) याची अधिकृत घोषणा केली.

महत्त्वाचे म्हणजे कांद्याची किंमत नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने या जूनपासून केलेले सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत. कांद्याने देशातील सामान्य ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणण्यास सुरुवात केली आहे. दिल्लीच्या आझादपूर मंडईमध्ये कांद्याची घाऊक किंमत ५० रुपये किलो झाली आहे. २०१५ नंतर ही कांद्याची सर्वाधिक किंमत आहे.

त्याचबरोबर आशियातील सर्वात मोठा कांदा बाजार असलेल्या महाराष्ट्रातील लासलगावात कांदा ५० रुपये किलो या किमतीला विक्रीला आला आहे. व्यापारी म्हणाले की, देशात कांद्याचा साठा खूपच कमी आहे, त्यामुळे मंडईंमध्ये कांद्याचे भाव वाढत आहेत. आवक कमी झाल्यामुळेही कांद्याचे दर वाढत आहेत.

कांदा व्यापारी असोसिएशन, आझादपूर मंडीचे अध्यक्ष राजेंद्र शर्मा म्हणाले की, दक्षिण भारतातील राज्यांत अतिवृष्टी झाल्याने कांद्याचे पीक खराब होत आहे आणि नवीन पीक तयार होण्यास विलंब होत आहे, यामुळे कांद्याच्या किमती वाढत आहेत. शर्मा म्हणाले की २०१५ मध्ये कांद्याचे दर ५० रुपयांच्या वर गेले होते. त्यानंतरचे हे सर्वाधिक दर आहेत.

कांद्याची किंमत नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने गेल्या आठवड्यात आपली किमान निर्यात किंमत म्हणजेच MEP ८५० प्रति टन निश्चित केली जेणेकरून निर्यातीवरील बंदीमुळे देशातील बाजारात कांद्याचा पुरवठा कमी होणार नाही. विदेश व्यापार महासंचालनालयाच्या (DGFT) १३ सप्टेंबर २०१९ च्या अधिसूचनेनुसार, पुढील आदेश येईपर्यंत कांद्याची ८५० डॉलर प्रति टन पेक्षा अधिक किंमतीवर निर्यात करण्यास परवानगी दिली जाणार नाही.

Visit : policenama.com