दिल्ली विधानसभा निवडणुकीपुर्वी CM केजरीवालांनी PM मोदींच्या विरूध्द आखली ‘ही’ रणनिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीतील भाजपला मिळालेले घवघवीत यश आणि त्यानंतर त्यांनी कलम 370 रद्द करण्याच्या घेतलेल्या निर्णयानंतर भारतातील राजकारण मोठ्या प्रमाणात बदलले असून याचा सरळ प्रभाव तृणमूल काँग्रेस, आम आदमी पार्टी आणि सीपीएम वर पडला आहे.

पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यामुळे आधीच सावध झाल्या असून त्यांनी प्रशांत किशोर यांना आपल्या पक्षाची रणनीती बनविण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर या निवडणुकीचा मोठ्या प्रमाणात प्रभाव अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षावर देखील पडला आहे. एकेकाळी पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात सक्षम विरोधी पक्ष दिसत असलेली आम आदमी पार्टी सध्या ढेपाळली आहे. त्यामुळे आता अरविंद केजरीवाल यांना नव्याने रणनिती तयार करावी लागणार आहे.

विधानसभा निवडणूक महत्वाची

लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर काही महिन्यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला सामोरे जायचे आहे. लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव चिंतेचा विषय नाही. मात्र त्यांचा पराभव मोठ्या अंतराने झाल्याने विधानसभा निवडणुकीत याचा मोठा फटका बसू शकतो.

मतांच्या टक्केवारीत घट

2015 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीच्या उमेदवारांना एकूण मतदानापैकी 45 टक्के मते मिळाली होती. या जोरावर त्यांनी 70 पैकी 67 जागांवर विजय मिळवला होता. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या उमेदवारांना 33 टक्के मते मिळाली होती मात्र या निवडणुकीत त्यामध्ये मोठी घाट होऊन 18 टक्क्यांवर आली.

अरविंद केजरीवाल यांनी बदलली रणनीती

आधी प्रत्येक मुद्द्यावर मत मांडणाऱ्या अरविंद केजरीवाल यांनी सध्या मौन धारण केले आहे. कोणत्याही घटनेवर ते सध्या विरोध करत नाहीत किंवा भाजपाच्या भूमिकेला मिळती त्यांची भूमिका असते. त्याचबरोबर त्यांच्या सरकारने सध्या तीर्थक्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले असून त्यांचा प्रचार करण्यावर त्यांनी जोर दिला आहे. त्याचबरोबर महिलांना मोफत मेट्रो प्रवास असो किंवा मोफत बस प्रवास असो, अशा योजनांच्या आधारे ते जनतेच्या मनात जाण्याचा प्रयत्न करत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त-

You might also like