CM केजरीवालांनी PM मोदींसोबत केली दिल्लीला ‘वर्ल्ड क्लास सिटी’ बनवण्याची गोष्ट, सोनमनं ‘आठवण’ करून दिली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली विधानसभेत आम आदमी पार्टीने प्रचंड विजय मिळवल्यानंतर पंतप्रधान मोदींनी आप प्रमुख अरविंद केजरीवाल यांना ट्विट करत शुभेच्छा दिल्या. पीएम मोदींनी केजरीवाल यांना शुभेच्छा देत सांगितले की त्यांनी दिल्लीतील लोकांचा विश्वास सार्थक ठरवावा. यानंतर अरविंद केजरीवाल यांनी या ट्विटला उत्तर दिले होते. अरविंद केजरीवाल यांच्या उत्तरावर बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर हीने ट्विट करत त्यांना आश्वासनाची आठवण करुन दिली आहे.

केजरीवाल यांनी दिले पीएम मोदींना धन्यवाद –
आपच्या विजयानंतर पंतप्रधान मोदींनी ट्विट करत अरविंद केजरीवाल यांना शुभेच्छा दिल्या आणि सांगितले की, दिल्ली विधानसभा निवडणूकीत विजय प्राप्त केल्याने आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल यांना शुभेच्छा. मी तुम्हाला दिल्लीतील लोकांची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी शुभकामना देतो. यावर उत्तर देताना अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींना धन्यवाद दिले. त्यांनी ट्विट केले की खूप खूप धन्यवाद, आपल्या राजधानीला वर्ल्ड क्लास सिटी बनवण्यासाठी केंद्रासोबत मिळून काम करण्याची इच्छा व्यक्त करतो.

सोनम कपूर म्हणाली –
सोनम कपूरने ट्विट केले आणि अरविंद केजरीवाल यांना प्रदुषण मुक्त दिल्ली करण्याची आठवण करुन दिली. सोनम कपूरचे हे ट्विट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. यावर अनेक यूजर्सची प्रतिक्रिया देखील आली.

आपच्या प्रचंड विजयानंतर आता अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या विजयावर बोलताना सांगितले की हा दिल्लीचा विजय नाही तर भारत मातेचा विजय आहे, संपूर्ण देशाचा विजय आहे. आज मंगळवार आहे, हनुमानाचा (बजरंगबली) दिवस. बजरंगबलीने दिल्लीवर कृपा केली. बजरंगबलीचे खूप खूप आभार. आपण देवाकडे प्रार्थना करु इच्छितो की येणारे 5 वर्ष देखील ते आपल्याला दिशा दाखवतील. पाच वर्ष सेवा करण्याची शक्ती आम्हाला देतील.