Arvind Kejriwal | केजरीवालांचं थेट भाजपला आव्हान ! म्हणाले – ‘त्या निवडणुकीत भाजपचा विजय झाला तर राजकारण सोडणार’;

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Arvind Kejriwal | देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये महापालिका एकत्र करण्याबाबतच्या विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळात मंजुरी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी थेट भाजपला आव्हान दिलं आहे.

 

दिल्लीतील महापालिका निवडणुका (Municipal Elections Delhi) टाळणे हा शहिदांचा अपमान आहे. पराभवाच्या भीतीने भाजप (BJP) निवडणुका घेणं टाळत आहे. भविष्यात हे विधानसभा आणि लोकसभाही घेणार नाहीत. जर आताच दिल्लीतील महापालिका निवडणुकीत भाजपने विजय मिळवला तर मी राजकारण (Politics) सोडेन, असं अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी म्हटलं आहे.

 

भाजप स्वत:ला जगातील सर्वात मोठा पक्ष मानतो मात्र हाच जगातील पक्ष एका छोट्या आम आदमी (AAP) पक्षाला घाबरून पळ काढत आहे?, जर हिंमत असेल तर महापालिका निवडणुका वेळेत घेऊन दाखवाव्यात, असंही केजरीवाल म्हणाले.

 

दरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या टीकेवर भाजपकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
आताच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये केजरीवालांच्या झाडूने पंजाब (Punjab) राज्यात काँग्रेस (Congress) आणि भाजपचा सफाया केला आहे.
या निवडणुकीनंतर आता महापालिकेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा भाजप आणि आप समोरासमोर आले आहेत.

 

Web Title :- Arvind Kejriwal | we will leave politics aap leader arvind kejriwal challenges bjp over delhi mcd elections

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sara Sachin Tendulkar | सारा तेंडुलकर करतेय लंडनमध्ये धमाल, सुंदर फोटो शेअर करून चाहत्यांना लावलं वेड

 

Pune Crime | सामाईक जागेच्या वादातून तिघांना कुऱ्हाडीने मारहाण, लोणी काळभोर परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या एकाला अटक

 

Sanjay Raut | पाटणकरांवरच्या कारवाईनंतर मुख्यमंत्र्यांंसोबत काय बोलणं झालं?, संजय राऊत म्हणाले…