दिल्लीत ‘आयुष्यमान’ला मुख्यमंत्री केजरीवाल यांचा नकार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत योजना दिल्लीत लागू करण्यास नकार दिला आहे. केजरीवाल यांनी शुक्रवारी केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांना पत्र लिहून ही योजना लागू करण्यास नकार कळवला आहे. त्यात त्यांनी असे म्हणले आहे की दिल्लीत जर आप सरकारने आरोग्या संबंधित योजनांची घोषणा केली असेल तर ती बंद करुन त्याजागी आयुष्यमान भारत योजना लागू केली गेली तर त्यात नागरिकांचे मोठे नुकसान होईल.

केजरीवाल यांनी या पत्रात पुढे असे लिहले आहे की, दिल्लीत खूप आधीपासूनच आयुष्मान भारत सारखी आरोग्य योजना लागू आहे. दिल्ली सरकारच्या आरोग्य योजनेत त्या सर्व गोष्टी आहेत ज्या आयुष्यमान भारत योजनेत आहेत. एवढंच नाही तर दिल्लीवासीयांसाठी यासारख्या अनेक चांगल्या योजना आहे. दिल्लीची आरोग्य योजना आयुष्यमान भारत योजनेपेक्षा 10 पट आधिक मोठी आणि व्यापक आहे. या पत्रात त्यांनी केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत योजनेवर कठोर टीका करत आयुष्यमान पेक्षा दिल्ली सरकारची योजना किती उत्तम आहे हे सांगिलते आहे. त्यासाठी त्यांनी त्यात आयुष्यमान आणि दिल्ली सरकारच्या आरोग्य योजनेची तुलना केली आहे.

तुलना करताना ते असे देखील म्हणाले की, उत्तर प्रदेश, हरियाणा हे दिल्लीपेक्षा मोठी राज्य आहेत, तिथे देखील आयुष्यमान योजना लागू आहे. परंतू असे असून देखील रोज लाखो नागरिक दिल्ली सरकारच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येतात. असे खूप कमी वेळा होईल की दिल्लीतील एखादा व्यक्ती उपचारासाठी त्या राज्यात गेला असेल. त्यामुळे दिल्लीतील आरोग्य योजना आयुष्यमान पेक्षा चांगल्या आहेत असे म्हणायला वाव आहे असे म्हणत त्यांनी आयुष्यमान योजनेवर टीका केली.