Arvind Sawant | अरविंद सावंत यांचे मशाल यात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार टीकास्त्र; म्हणाले…

अमरावती : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेनेत फूट पडल्यानंतर विविध माध्यमांतून शिवसेनेचे ठाकरे गट व शिंदे गट एकमेकांवर टीका करत आहेत. त्यातच काल मशाल यात्रेदरम्यान बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली आहे. मशाल यात्रा ही सध्या विदर्भात असून यावेळी उपस्थित सभेला संबोधित करताना अरविंद सावंतांनी(Arvind Sawant) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, फडणवीसांच्या मांडीला मांडी लावून मी कसा बसू? असे म्हणणारे आज त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसले आहेत.
यावेळी अमरावती येथे बोलताना अरविंद सावंत(Arvind Sawant) म्हणाले की, ‘२०१४ मध्ये तत्कालीन भाजप नेते एकनाथ खडसे यांनी युती तुटली, असे जाहीर केले होते. भाजपाला वाटलं की २०१२ मध्ये बाळासाहेबांचे निधन झाले. आता शिवसेनेचं काही खरं नाही. उद्धव ठाकरे हे संयमी नेतृत्व आहे. यांना चेपून काढला येईल. मात्र, उद्धव ठाकरे २०१४ मध्ये भाजपाविरोधात एकटे उभे राहिले. शिवसैनिकांनी समर्पित होऊन काम केलं आणि पराक्रम घडला. त्यावेळी ६३ आमदार निवडून आले. शिवसेना विरोधात बसली आज जे दाढीवाले मिंधे सोडून गेले, त्यांनाच विरोधी पक्षनेते केलं होतं. तरीही त्यांचा जीव सत्तेसाठी खालीवर होत होता.’ असा टोला अरविंद सावंत यांनी यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.
तसेच, एकनाथ शिंदे यांनीच उद्धव ठाकरेंना २०१४ मध्ये भाजपाबरोबर सत्तास्थापन करण्याची मागणी केली होती. हे उद्धव ठाकरेंना तेंव्हाही मान्य नव्हतं. केवळ मिंधे लोकांसाठी त्यांनी पुन्हा भाजपाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला होता. कल्याण डोंबिवलीच्या निवडणुकीवेळी मी प्रचाराला व्यासपीठावर होतो. तेव्हा याच दाढीवाल्या बाबाने मोठी नाटकं केली होती, एक मोठा अर्ज लिहून आणला होता. ‘साहेब, आपल्या सामान्य माणसांची कामं होत नाहीत. गरिबांना न्या मिळत नाही. यांच्या मांडीला मांडी लावून मी कसा बसू? माझा राजीनामा घ्या’, असं ते म्हणाले होते. मात्र, तोच बाबा आज देवेंद्र फडणवीसांच्या मांडीवर जाऊन बसला आहे. अशी खोचक टीका देखील यावेळी बोलताना अरविंद सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली.
यादरम्यान, बोलताना त्यांनी खासदार नवनीत राणा यांच्यावर देखील टीका केली.
‘गोरा गोमटा वरवंटा लोक रंगाला बघून बोलतात, हा वरवंटा सगळ्यांच्या डोक्यावरून फिरतो,
तरी कुणाला कळत नाही. जात प्रमाणपत्र खोटे असतानाही अजूनही अटक झाली नाही, शेवटी कोर्टाने
पोलिसांना विचारले तुम्ही मॅनेज झालात का? हे दुर्दैवच आहे. असा टोला त्यांनी यावेळी बोलताना खासदार नवनीत राणा यांना लगावला.
Web Title :- Arvind Sawant | arvind sawant criticized cm eknath shinde in shivsena mashal morcha in amravati
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
MP Sanjay Raut | संजय राऊतांनी व्यक्त केली इच्छा, म्हणाले – ‘माझ्या बायोपिकमध्ये…’