Arvind Sawant | अरविंद सावंतांनी वर्तवलं भाकित, ‘गुजरातला प्रकल्प पळवले आणि निवडणूक जाहीर झाली आता महाराष्ट्रासाठी…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Arvind Sawant | महाराष्ट्राचा विकास करणारे सर्व प्रकल्प गुजरातला पळवले. त्याबाबत घोषणा करताच गुजरातची निवडणूक लागली. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात देखील प्रकल्पांबाबत घोषणा होत आहेत. त्यामुळे कदाचित महाराष्ट्रातही विधानसभेची निवडणूक (Assembly Election) लागेल, असे भाकित शिवसेना नेते (Shivsena leader) खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी वर्तवले आहे. केंद्र सरकारने (Central Government) महाराष्ट्रात दोन लाख कोटींचे प्रकल्प मंजूर केल्याची घोषणा नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केली. यानंतर खासदार यांनी हे भाकित केले आहे. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते.

 

अरविंद सावंत (Arvind Sawant) म्हणाले, गुजरातला प्रकल्प पळवायचे थांबले, कारण निवडणूक जाहीर झाली. आता महाराष्ट्राला प्रलोभण देण्याचे काम सुरु आहे. राज्यात घोषणांचा सुकाळ आणि अंमलबजावणीचा दुष्काळ आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शेतात जाऊन घाम गाळला. हे सर्व ते प्रसिद्धीसाठी करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी शेतात काम केले. स्ट्रॉबेरीचा विषय मांडला. मात्र, आज महाराष्ट्रातील शेतकर्‍यांचे काळीज फाटले आहे. आत्महत्या होत आहेत. त्यांनी या शेतकर्‍यांना मदत करणे सोडले आणि प्रसिद्धीसाठी हे सर्व सुरू केले आहे.

 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माहिती दिली की, महाराष्ट्रात दोन लाख कोटींपेक्षा जास्त 225 प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत.
महाराष्ट्रात रेल्वेसाठी 75 हजार कोटी आणि रस्ते विकास प्रकल्पासाठी 50 हजार कोटींचा निधी देण्यात आला आहे.
केंद्र सरकार पायाभूत सुविधांवर खर्च करत असताना त्यातून रोजगाराच्या लाखो संधी निर्माण होतात. भविष्यात महाराष्ट्रात तरुणांसाठी रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होतील.

तत्पूर्वी शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde-Fadnavis Government) घोषणा केली
की, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्यात यंदा 75 हजार शासकीय पदभरती करणार आहोत.
‘महासंकल्प’ रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून कोकण विभागातील पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्र देऊन गुरुवारी या मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे.
राज्यात येत्या आठवडाभरात 18 हजार 500 पदांसाठी पोलीस भरतीची जाहिरात निघणार आहे.
तर महिनाभरात ग्रामविकास विभागात 10 हजार 500 पदांची भरती केली जाणार आहे. यावरून अरविंद सावंत यांनी टीका केली आहे.

 

Web Title :- Arvind Sawant | arvind sawant predicted maharashtra assembly election after 2 lakh crore projects allotted to maharashtra by modi government

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Navneet Rana | सुषमा आंधारेंच्या टीकेला नवनीत राणांचे प्रत्युत्तर, ‘कुणाला आळशी माणूस बघायचा असेल, तर ‘मातोश्री’वर…’

Deepika Padukone | आलियाच्या होणाऱ्या बाळासाठी दीपिकाने शेअर केली ‘ती’ पोस्ट, सगळीकडे होत आहे चर्चा

Kartiki Ekadashi | औरंगाबादचे दाम्पत्य ठरले महापूजेचे मानकरी; उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पांडुरंगाची सपत्नीक महापूजा