Arvind Sawant | ‘त्यांना दुसऱ्यांच्या डोळ्यातलं कुसळ दिसत, पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ नाही’, अरविंद सावंतांचा बावनकुळेंवर हल्लाबोल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Arvind Sawant | राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबाबत एक वक्तव्य केले होते. त्यावरून सध्या राज्यात चांगलाच राजकीय गोंधळ सुरू असून त्यातच राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या औरंगजेबाबाबतच्या वक्तव्याने सध्या नवीन वाद सुरू झाला आहे. आमदार जितेंद्र आव्हाडांनी औरंगजेब हा धर्मद्वेष्टा नव्हता असा उल्लेख केला होता त्यावर सत्ताधारी भाजपकडून यावर टीका होत आहे. त्यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी औरंगजेबचा ‘जी’ असा आदरातिथ्याने उल्लेख केल्यामुळे त्यांच्यावर विरोधकांकडून टीका होत आहे. त्यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंतांनी (Arvind Sawant) बावनकुळेंवर चांगलीच टीका केली आहे.

 

अरविंद सावंतांनी (Arvind Sawant) भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंना खोचक सल्ला दिला आहे. अरविंद सावंत म्हणाले, “त्यांना म्हणावं शुद्धीवर या लवकर. त्यांना दुसऱ्यांच्या डोळ्यातलं कुसळ दुसतं, पण त्यांच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंचा अपमान लक्षात राहात नाही त्यांच्या. ती कुसळ ते शोधत असतात. बरोबर ते बुमरँग होऊन परत त्यांच्याच अंगावर येतं. आता जा म्हणावं, तिथे संभाजीनगरला वाट बघतायत तुमची. तिथे जाऊन नतमस्तक व्हा.”

असा सल्ला देतच अरविंद सावंत (Arvind Sawant) पुढे म्हणाले, ‘औरंगजेबजी, मै आया हूँ असं म्हणा, म्हणजे बरं होईल’.

 

यादरम्यान बोलताना त्यांनी शिंदे गटाला देखील टोला लगावला.
अरविंद सावंत म्हणाले, ‘मला वाटत नाही काही डॅमेज वगैरे असेल.
विनाशकाले विपरीत बुद्धी आहे काही लोकांना. आम्हाला बाळासाहेब ठाकरेंनी एक स्वाभिमान शिकवला. स्वत्व आणि तत्व न सोडण्याचा. बाबासाहेब आंबेडकरांनीही आम्हाला तेच सांगितलं. एक वेळ लढाऊ नाही झालात तरी चालेल, पण विकाऊ होऊ नका. आता विकाऊ झालेल्या माणसांबद्दल काय बोलायचं? ते विकाऊ आहेत. सोडून द्यायचं. असं म्हणत त्यांनी शिंदे गटावर टीका केली आहे.

 

Web Title :- Arvind Sawant | arvind sawant shivsena thackeray group slams chandrashekhar bawankule aurangjeb

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Budget 2023 | अर्थमंत्री सीतारामन मध्यमवर्गीयांना देऊ शकतात मोठी भेट, टॅक्स सवलत मर्यादा वाढवण्यावर विचार

Nana Patole | ‘मुंबई व महाराष्ट्राचे महत्व कमी करण्यासाठी योगी आदित्यनाथांना पायघड्या’ – नाना पटोले

Aditya Thackeray | आदित्य ठाकरेंचा शिंदे-फडणवीस सरकारला टोला; म्हणाले, ‘आपल्याकडे एक सीएम तर दुसरे…’