Arvind Sawant | आधी ‘पटक देंगे’ म्हटलं आणि नंतर अमित शाह मातोश्रीवर आले, शिवसेनेचा पलटवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलान –  शिवसेनेनं (Shivsena) आपल्या जागा पाडून पाठीत खंजीर खुपसला. राजकारणामध्ये धोका सहन करु नका. जे राजकारणात धोका देत असतात त्यांचं राजकारण यशस्वी होत नसतं. त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, असं म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला. यावर शिवसेनेचे नेते अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी पलटवार केला आहे. भाजपचं सगळं तसंच असतं, त्यांचं नुसतं मिशन असतं, आज काय लोटस मिशन, परवा काय दुसरं मिशन. त्यामुळे मूळ प्रश्न मिसींग असतात. जनतेच्या प्रश्नांपासून दूर आहेत, मराठी माणसांच्या अस्मितेपासून ते दूर आहेत. मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) म्हणजे शिवसेनेचा भगवा झेंडा कुणीही तिथून हलवू शकत नाही, असं अरविंद सावंत (Arvind Sawant) म्हणाले.

2019 च्या निवडणुकांपूर्वी सेनेला असेच अव्हान दिले होते. मात्र, निकाल समोर येताच हेच अमित शाह हे मातोश्रीवर दाखल झाले होते. त्यानंतर लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) एकत्र लढण्याचा निर्णय झाला होता. त्या दरम्यान विधानसभा निवडणुकांचे (Assembly Election) स्वरुप कसे असणार हे देखील ठरल्याचे अरविंद सांवंत यांनी सांगितले. एवढेच नाही तर जागा वाटपही कसे असणार निश्चित झाले होते. पण आकड्यांचा खेळ जुळला नाही आणि भाजपनेच (BJP) शिवसेनेला धोका दिल्याचे ते म्हणाले. त्यावेळी पट्टक देंगे म्हणणारे मातोश्रीवर (Matoshree) आले आताही काही सांगता येत नाही, असेही सावंत (Arvind Sawant) म्हणाले.

किमान त्या सहकार्याची आठवण ठेवा

सुरुवातीच्या काळात भाजपला राज्यात शिवसेनेची साथ मिळाली. त्यामुळे भाजपचे आजचे हे चित्र आहे. एवढेच नाहीतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) ज्या पदावर आहेत त्यामध्ये देखील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे मोठे योगदान राहिले आहे. काळाच्या ओघात आणि सत्तेपुढे याची त्यांना जाणीव राहिली नाही. किमान उभारीच्या काळात केलेले सहकर्य आठवून तरी त्यांनी शिवसेनेबाबत वक्तव्य करणे गरजेचे आहे, असा सल्ला अरविंद सावंत यांनी दिला.

Web Title :-  Arvind Sawant | finally be aware of the cess why sawants language of gratitude after shahs meeting

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | काहीही करुन मुंबईत भाजपचा महापौर पाहिजे, BMC ची शेवटची निवडणूक समजून लढा – देवेंद्र फडणवीस

Health Problems Symptoms | सकाळी उठण्याची इच्छा होत नाही, खुप आळस येतो का? मग तुमच्या आरोग्यासाठी व्हा अलर्ट

Warm Water Effects | गरम पाणी पिण्याने खरंच वजन कमी होते का? जाणून घ्या यामागील सत्य