शिवसेना-भाजप ‘युती’ तुटल्यात ‘जमा’, केंद्रीय मंत्री अरविंद सावंतांचा ‘राजीनामा’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा वाढतच चालला आहे. शिवसेना जोपर्यंत एनडीएतून बाहेर पडत नाही तोपर्यंत आम्ही शिवसेनेबाबत विचार करू शकत नाही अशी भूमिका आघाडीने घेतली होती. त्यानंतर शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी आपल्या मंत्री पदाचा राजीनामा दिला आहे.

अरविंद सावंत हे केंद्रात अवजड उद्योग खात्याचे मंत्री होते. यामुळे आता शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचे नवीन समीकरण सत्तास्थापनेसाठी पहायला मिळणार का याकडे सर्व राज्याचे लक्ष लागून आहे.

तत्पूर्वी जास्त संख्याबळ असलेल्या भाजपने विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी भाजपने शिवसेनेने आपल्याला साथ न दिल्याने हा निर्णय घेत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर शिवसेनेच्या गोटात सत्ता स्थापनेच्या हालचालींना मोठा वेग आला होता.

Visit : Policenama.com