Arvind Sawant | मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासकीय कारभाराची देखील चौकशी झाली पाहिजे – अरविंद सावंत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अंधेरी पूर्व येथे होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी (Andheri By Election) 3 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या (Shivsena) ठाकरे गटाचे (Thackeray Group) आमदार आणि खासदार जनतेसोबत संवाद साधत आहेत. खासदार अरविंद सावंत (MP Arvind Sawant) यांनी या निवडणुकीवर भाष्य केले आहे. दिवंगत रमेश लटके (Ramesh Latke) यांच्या पत्नी ऋतुजा लटके (Rutuja Latke) या निवडणुकीत प्रचंड मतांनी विजयी होतील, असे अरविंद सावंत (Arvind Sawant) म्हणाले.

 

शिंदे यांच्या गटाने आणि भाजपने (BJP) वाममार्गाने राज्याची सत्ता बळकवली आहे. त्यामुळे जनतेत त्यांच्या विरोधात मोठी चीड निर्माण झाली आहे. त्याची प्रतिक्रिया जनता अंधेरीच्या निवडणुकीत दाखवेल आणि ऋतुजा लटके यांचा प्रचंड मतांनी विजय होईल, असे सावंत (Arvind Sawant) म्हणाले. ज्याप्रमाणे मुंबई महानगरपालिकेची (BMC) कॅग चौकशी केली जात आहे, त्याप्रमाणे नागपूर, पुणे, ठाणे आणि नाशिक महानगरपालिकांची चौकशी करा, अशी मागणी देखील सावंत यांनी केली. जी काही चौकशी सुरु आहे, ती नि:पक्ष झाली पाहिजे. मुंबई महापालिकेच्या प्रशासकीय कारभाराची देखील चौकशी करा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये नगरविकास मंत्री होते. आता देखील तेच नगरविकास मंत्री आहेत. त्यामुळे या सर्व कारभाराला तेच जबाबदार आहेत, असे सावंत यावेळी म्हणाले.

 

सर्व महापालिकांची नि:पक्ष चौकशी केली, तर ती न्यायीक भूमिका घेतली असे होईल.
नाहीतर या सर्व चौकशा राजकीय सुडापोटी करण्यात आल्या आहेत, असा जनतेत समज जाईल, असे देखील अरविंद सावंत यावेळी म्हणाले.

 

Web Title :- Arvind Sawant | The administrative affairs of the Mumbai Municipal Corporation should also be investigated

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune PMC News | रूफटॉपवर बेकायदेशीररित्या हॉटेल व्यवसाय करणार्‍या 8 जणांविरोधात महापालिकेची फौजदारी कारवाई

Gayatri Datar | गायत्री दातारचं टेलिव्हिजनवर कमबॅक; ‘या’ मालिकेतुन येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Kishori Pednekar | किशोरी पेडणेकरांची चौकशीनंतर प्रतिक्रिया, म्हणाल्या – ‘कर नाही त्याला डर…’