माजी मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यनम यांचा दावा, जीडीपी वृद्धीचा दर ७ नाही, ४.५ टक्के होता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताच्या माजी मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यनम यांनी मोदी सरकारच्या काळातील जीडीपीच्या आकडेवारीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याच्या मते लोकांना सांगण्यात आलेला वृद्धिदर आणि खरा वृद्धीदर यात बराच फरक आहे. यावर बोलताना त्यांनी आर्थिक वृद्धीदर अडीच टक्क्यांनी अधिक सांगितला आहे. असा दावा करताना ते म्हणाले की की २०११-१२ पासून २०१६-१७ या काळात सांगण्यात आलेल्या आर्थिक वृद्धीदर तब्बल अडीच टक्क्यांनी आधिक सांगितला गेला. म्हणजे भारताच्या जीडीपी वृद्धीचा दर हा ७ टक्के नसून ४.५ टक्के होता असे देखील अरविंद सुब्रमण्यन यांनी सांगितले.

जीडीपी वृद्धीदर ४.५ टक्के –

भारताची जीडीपी वृद्धी दर ७ टक्के राहीला होता, यातून सरकारने भारताची अर्थव्यवस्था आधिक मजबूत असल्याचे सांगितले. परंतू भारताची माजी मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यन यांनीच असा दावा केल्याने आता सरकारच्या विश्वासाला तडा जाण्याची शक्यता आहे. या मागचा सरकारचा हेतू काय होता हे स्पष्ट झाले नाही. परंतू सुब्रमण्यम यांचे म्हणणे आहे की ही आकडेवारी खूप कमी होती आणि खूप जास्त दाखवण्यात आली. हा वृद्धीदर साडे चार टक्क्यांच्या आसपास होता असा त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता पुढे काय होते हे लवकरच स्पष्ट होईल. परंतू यावर सरकारने कोणतेही स्पष्टीकरण अजून देखील दिलेले नाही.

आरोग्यविषयक वृत्त –

वजन कमी करण्याची ‘ही’ थेरपी करून पाहा

अळूच्या भाजीने तुमचे वजन राहिल नियंत्रणात

घटस्फोटीत, विधुर पुरूषांना हृदयरोगाने मृत्युचा अधिक धोका

स्मार्टफोनच्या अतिवापराने तुम्हालाही होऊ शकतो ‘नोमोफोबिया’!

 

You might also like