Aryan Khan arrest case | ‘समीर वानखेडे भाजपचा कार्यकर्ता नाही, त्यामुळे…’, वानखेडेंवरील खंडणीच्या आरोपानंतर भाजपची सावध भूमिका

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईतील क्रूझ वरील ड्रग्स पार्टी प्रकरणात आर्यन खानला अटक (Aryan Khan arrest case) करण्यात आली आहे. आर्यन खान अटक प्रकरणी (Aryan Khan arrest case) पंच किरण गोसावी (Kiran Gosavi) याने शाहरुख खानकडे (Shah Rukh Khan) 25 कोटींची खंडणी (Ransom) मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यानंतर भाजपही (BJP) बॅकफूटवर गेली आहे. समीर वानखेडे (Sameer Wankhede) हा काही भाजपचा कार्यकर्ता नाही, त्यामुळे त्याची पाठराखण करायचा विषय येत नाही, अशी सावध प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिली.

पुण्यात (Pune) पत्रकारांशी बोलत असताना चंद्रकांत पाटील यांनी आर्यन खान अटक प्रकरणावर (Aryan Khan arrest case) आपली प्रतिक्रिया दिली. समीर वानखेडे हा भाजपचा कार्यकर्ता नाही. त्यामुळे त्याची पाठराखण करायचा विषय येत नाही. जर या प्रकरणी आज काही एनसीबीवर (NCB) आरोप करण्यात आले आहे. ज्यांनी कुणी केले आहे. त्याची चौकशी व्हावी, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

शरद पवारांनी (Sharad Pawar) पुण्यात पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली, यावरुन चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर (NCP) निशाणा साधला.
शरद पवार हळूहळू अजित पवारांच्या (Ajit Pawar) हतात असलेल्या ऑल पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) आणि पुणे काढून घेत आहेत.
एकाप्रकारे अजित पवार यांची ताकद कमी केली जात असल्याचा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला.

 

Web Title :- Aryan Khan Arrest Case | Ncb officer sameer wankhede is not some bjp activist say bjp leader chandrakant patil in pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Coronavirus in Maharashtra | दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात 1,520 ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime | पुणे पोलिसांकडून वाळू व्यावसायिक संतोष जगताप खून प्रकरणात दोघांना अटक (व्हिडीओ)

Pimpri Corona | दिलासादायक ! पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 63 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी