Aryan Khan Cruise Case | आर्यन खान प्रकरणी समीर वानखेडेंवर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल, सीबीआयची छापेमारे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Aryan Khan Cruise Case | कॉर्डेलिया क्रूझवर (Cordelia Cruise) बॉलीवुड अभिनेता शाहरुख खान (Bollywood Actor Shah Rukh Khan) याचा मुलगा आर्यन खान याला कथित ड्रग्ज प्रकरणात ताब्यात घेतले होते. यानंतर तत्कालीन एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (NCB Officer Sameer Wankhede) आणि इतर तिघांनी 25 कोटी रुपये मागितल्या प्रकरणी सीबीआयने (CBI) गुन्हा (FIR) दाखल केला आहे. दरम्यान आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील (Aryan Khan Cruise Case) दोन तपासी अधिकाऱ्यांना काही दिवसांपूर्वी निलंबित केले होते.

गुन्हा दाखल केल्यानतंर सीबीआयने वानखेडे यांच्या मालमत्तांसह देशभरात 29 ठिकाणी छापे मारले (CBI Raid) आहेत. सीबीआयने मुंबई, रांची, दिल्ली आणि कानपूर (उत्तर प्रदेश) येथे छापेमारी केली आहे. सीबीआयने आयआरएस (Indian Revenue Service) अधिकारी समीर वानखेडे यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचा (Corruption) गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या घराची, अन्य ठिकाणांची झडती घेतली जात आहे. वानखेडे हे पूर्वी एनसीबीचे (मुंबई झोन) संचालक होते.

 

 

 

समीर वानखेडे आणि इतर चार जणांवर आर्यन खान कथित ड्रग्ज प्रकरणात (Aryan Khan Cruise Case)
शाहरुख खानकडून 25 कोटींची लाच मागितल्याचा (Demand a Bribe) आरोप करण्यात आला आहे.
त्यांनी 25 लाख रुपये उकळल्याचेही आरोपांमध्ये म्हटले आहे. या प्रकरणात वानखेडे यांच्यासह एनसीबीचे आणखी दोन माजी अधिकारी आणि दोन खासगी व्यक्ती आरोपी आहेत.

 

Web Title :- Aryan Khan Cruise Case cbi registers corruption case against aryan khan case former ncb officer officer sameer wankhede cbi raids at 29 places including mumbai

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chitra Wagh | ‘उद्धवजी, ज्या दिवशी तुम्ही राजीनामा दिला त्याच दिवशी महाविकास आघाडीचा पोपट मेला, कायद्याची भाषा समजत नसेल तर…’

Nana Patole on Ajit Pawar | अजित पवारांच्या आरोपांना नाना पटोलेंचे प्रत्युत्तर, म्हणाले-‘अजित पवार खोटं बोलत आहेत, राजिनाम्याची कल्पना…’

Devendra Fadnavis | परमबीर सिंह यांचं निलंबन मागे, फडणवीस म्हणाले…. (व्हिडिओ)

Chandrashekhar Bawankule | ‘बाळासाहेब हे लढवय्ये होते, तर उद्धव ठाकरे रडोबा आहेत’, बावनकुळेंचा ठाकरेंवर घणाघात (व्हिडिओ)

Maharashtra Cabinet Expansion | कोर्टाचा निकाल आला आता मंत्रिमंडळ विस्तार कधी?, बच्चू कडू म्हणाले – ‘आता विस्तार झाला नाही तर मग…’

Param Bir Singh Suspension Orders Revoked | शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय ! मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावरील आरोप मागे, निलंबन देखील रद्द