Aryan Khan Drug Case | हायकोर्टात समीर वानखेडेंनी शाहरुख खानसोबतचे चॅटिंग दाखवले, दोघांमध्ये काय संवाद झाला? जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या कॉर्डेलिया (Cordelia Cruz) ड्रग्ज क्रूज प्रकरणी (Aryan Khan Drug Case) एनसीबीचे (NCB) माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांची चौकशी सुरु आहे. आर्यन खानला (Aryan Khan Drug Case) सोडवण्यासाठी वानखेडे यांनी आर्यन खानच्या कुटुंबियांकडे 25 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. वानखेडे आणि शाहरुख खान (Shah Rukh Khan) यांच्यात अनेकवेळा बोलणं झाल्याचा खुलासा त्यांनी केला आहे. समीर वानखेडे यांनी आपली बाजू मांडताना शाहरुख खान सोबत झालेल्या चॅटिंगचे स्क्रिनशॉट (Chatting Screenshot) सादर केले आहेत.

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात (Aryan Khan Drug Case) शाहरुख खान याने समीर वानखेडे यांच्याकडे आर्यनला सोडवण्याची विनंती केल्याचे चॅटमधून समोर आले आहे. यामध्ये शाहरूख खानने म्हटले, मी एक बाप आहे आणि तुम्ही देखील बाप आहात. माझा मुलगा चुकला असेल पण त्याला सांभाळून घ्या. याबाबत आपल्याला काय करता येईल ते सगळं आपण करु, अशी विनंती शाहरुखने केली आहे.

समीर वानखेडे यांच्याकडून हायकोर्टात (High Court) सादर करण्यात आलेले चॅट 3 ऑक्टोबर 2021 चे आहे. तत्कालीन एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि शाहरुख खान यांच्यातील हा संवाद सकाळी 10 वाजून 37 मिनिटाचा आहे.

दोघांमध्ये काय चॅट झाले?

शाहरुख खान – समीर सर, मी तुमच्यासोबत एक मिनटांसाठी बोलू शकतो का? मला कल्पना आहे की, अशा प्रकारे बोलणे कदाचित पूर्णपणे चुकीचे आहे. परंतु, एक वडील म्हणून तुमच्याशी संवाद साधू शकतो का?

समीर वानखेडे – प्लीज कॉल

शाहरुख खान – फोन करण्यासाठी ही योग्य वेळ आहे का? धन्यवाद

4 ऑक्टोबर 2021 चे चॅट

शाहरुख खान – तुम्ही माझ्याबद्दल व्यक्त केलेले विचार आणि वैयक्तिक माहितीसाठी मी तुमचे आभार मानू शकत नाही. तो असा व्यक्ती होईल ज्याचा तुम्हाला आणि मला दोघांना अभिमान वाटेल. यासाठी मी प्रयत्न करेल. ही घटना त्याच्या आयुष्याला कलाटणी देईल. मी वचन देतो, चांगल्या मार्गाने या देशाला पुढे नेण्यासाठी प्रामाणिक आणि कष्टाळू तरुणांची गरज आहे. तुम्ही आणि मी आमची भूमिका पार पाडली आहे. तुमच्या दयाळूपणा आणि समर्थनासाठी पुन्हा धन्यवाद. लव्ह SRK

समीर वानखेडे – माझ्या शुभेच्छा आहेत.

शाहरुख खान – तुम्ही एक चांगली व्यक्ती आहात… कृपया आज त्याच्यावर दया दाखवा… मी आपल्याला विनंती करतो…

समीर वानखेडे – Don’t Worry…

शाहरुख खान – देव तुमचं भलं करो… जेव्हा तुम्ही म्हणाल, तेव्हा मला फक्त सांगा… मला तुम्हाला प्रत्यक्ष भेटून
मिठी मारायची आहे. तुमच्यासाठी जेव्हा ते सोयीचे असेल तेव्हा मला कृपया कळवा.
तुमच्या कामाविषयी मला कायम आदर आहे आणि राहील. बिग रिस्पेक्ट

समीर वानखेडे- नक्कीच आपण भेटुयात… आधी हे सगळं प्रकरण संपवूयात…

Web Title : Aryan Khan Drug Case | aryan khan case former ncb officer sameer wankhede submitted chatting screenshot in high court with shahrukh khan after aryan khan arrest

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

DPDC Meeting Pune | जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दगडूशेठ गणपती देवस्थानला ‘क’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा ! जिल्ह्यात ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ योजना राबविणार-पालकमंत्री चंद्रकांत पाटील

Maharashtra Politics News | ‘…तर बावनकुळेंनी बारामतीमधून अजितदादांच्या विरोधात निवडणूक लढवावी’, राष्ट्रवादीच्या आमदाराचं खुलं आव्हान

Pune Crime News | सोलापूरचे तोतया पत्रकार हनमे बंधूंनी बडया बिल्डरकडे देखील मागितली होती खंडणी; 50 लाख अन् 2 फ्लॅटची होती डिमांड, जाणून घ्या प्रकरण