×
Homeक्राईम स्टोरीAryan Khan Drug Case | भाजपा नेत्याचा मोठा दावा ! प्रभाकर साईलनं...

Aryan Khan Drug Case | भाजपा नेत्याचा मोठा दावा ! प्रभाकर साईलनं समीर वानखेडेंवर पैसे घेतल्याचा खोटा आरोप केला? पहा ‘स्टिंग ऑपरेशन’चा व्हिडीओ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Aryan Khan Drug Case | आर्यन खान प्रकरणी (Aryan Khan Drug Case) भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी एक व्हिडिओ ट्विट करून मोठा दावा केला आहे. व्हिडिओ पोस्ट करत त्यांनी नोटरी रामजी गुप्ता (Ramji Gupta) यांचे स्टिंग ऑपरेशन केलं आहे. प्रभाकर साईल (Prabhakar Sail) याने किरण गोसावी (Kiran Gosavi) यांच्या पैशासाठी हे सर्व केल्याचे रामजी यांनी सांगितले. यामागे मियां नवाब आणि मनोज असल्याचे ते स्पष्टपणे सांगत आहेत.

Pune Crime | पुण्यात 30 वर्षीय तरुणाचा भल्या पहाटे खून; कोंढाव्यातील घटना

मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्या मते, हे रामजी गुप्ता नावाच्या व्यक्तीचे स्टिंग ऑपरेशन आहे. ज्यामध्ये तो म्हणत आहे की, प्रभाकर साईलने किरण गोसावी यांच्याकडे पैसे मागितले होते. कारण त्याच्याकडे एक अंगरक्षक होता आणि त्याच्यासोबत हे सर्व घडले आहे, दरम्यान, या स्टिंग ऑपरेशनच्या सत्यतेची पुष्टी करत नाही. मात्र या स्टिंग ऑपरेशनमुळे प्रभाकर साईलवर सवाल उपस्थित होत आहेत. तर, प्रभाकर साईल यानं किरण गोसावीकडे पैशांची मागणी केली होती आणि त्यानं ते दिले नाहीत म्हणूनच प्रभाकर साईल आता आरोप करतोय, असं रामजी गुप्ता नावाचा व्यक्ती या व्हिडिओत बोलत असल्याचं मोहित कंबोज याचं मत आहे.

 

 

त्याचवेळी राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी ट्विट करून मोठा खुलासा करण्याकडे लक्ष वेधले आहे.
त्यांनी म्हटलं की, मी लवकरच स्पेशल-26 रिलीज करणार आहे.
आता आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात (Aryan Khan Drug Case) नवाब मलिक काय खुलासा करतात आणि त्याचा काय परिणाम होतो हे पाहावे लागेल.
तसेच, एनसीबीमधील एका अधिकाऱ्याने पाठवलेल्या निनावी पत्रामधील मजकूर येथे आहे.
एक जबाबदार नागरिक म्हणून मी हे पत्र डीजी नार्कोटिक्स यांना पाठवणार आहे.
आता समीर वानखेडेच्या चौकशीमध्ये हे पत्र समाविष्ट करण्याची विनंती केली आहे, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

दरम्यान, एनसीबीमध्ये (NCB) काही बोगस अधिकाऱ्यांची टोळी तयार झाली आहे.
ही टोळी लोकांना ड्रग्सच्या केसमध्ये फसवते.
अशा 26 केसचा या पत्रामध्ये उल्लेख आहे, अशी माहिती नवाब मलिक यांनी हे पत्र प्रसिद्ध केल्यानंतर दिली आहे.

हे देखील वाचा

Pune Corporation GB | नदीकाठ सुधार योजनेचे 3 टप्प्यांचे काम होणार पीपीपी तत्वावर; 700 कोटी रुपयांचे एका टप्प्याचे काम पालिका निधीतून तर उर्वरित 2 टप्पे ‘पीपीपी’मधून करण्याचा निर्णय

Pakistan captain Babar Azam | कुराणवर हात ठेवून बाबर आझमच्या ’गर्लफ्रेंड’ने घेतली शपथ, म्हणाली – ’10 वर्षापर्यंत शोषण करत होता पाकिस्तानी कर्णधार’

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Aryan Khan Drug Case | aryan khan drug case bjp leader mohit kamboj posted sting video questions raised on prabhakar sail

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update
Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News