Aryan Khan Drug Case | आर्यन खान प्रकरण ! सॅम डिसोझाने केला धक्कादायक खुलासा; सुनील पाटीलने पार्टीची घेतली होती माहिती

मुंबई : क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानची (Aryan Khan Drug Case) जामिनावर सुटका झाली आहे. या प्रकरणात रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. त्यानंतर आता मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी ज्या सॅम डिसोझावर (sam d’souza) आरोप केले. त्याने सोमवारी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गौप्यस्फोट केला आहे. क्रूझवर कारवाई करण्यात आली त्यामध्ये आर्यन खान (Aryan Khan Drug Case) अडकला. त्यानंतर आर्यनला यातून वाचवण्यासाठी किरण गोसावी सोबत आपण शाहरुख खानची (shah rukh khan) मॅनेजर पूजा दादलानीशी (pooja dadlani) भेट घेतली. परळ (Paral) येथे ही भेट झाली होती, मात्र गोसावी (Kiran Gosavi) हा खोटारडा असल्याने त्यांची सेटलमेंट होऊ शकली नसल्याची कबुली डिसोझाने दिली आहे.

या व्यवहारामध्ये डिसोझा महत्त्वाची भूमिका बजावत होता असे त्याने मुलाखतीत सांगितले. या प्रकरणाशी माझे काही देणे घेणे नाही. राजकारणी आणि सनदी अधिकाऱ्यांशी संपर्कात असलेल्या सुनील पाटील नामक व्यक्तीचा फोन डिसोझाला आला होता. त्याने आपण अहमदाबादमध्ये असून त्याला क्रूझ ड्रग्ज (Aryan Khan Drug Case) पार्टीसंबंधी काहीतरी महत्त्वाची माहिती असून एनसीबीशी (NCB) संपर्क साधायला सांगितले होते. त्यानंतर किरण गोसावीचा कॉल आल्याचा डिसोझाने सांगितले.

WhatsApp ने बंद केली 22 लाखापेक्षा जास्त अकाऊंट, यूजर्सने कधीही करू नयेत ‘या’ चूका; जाणून घ्या

या प्रकरणात मला पडायचे नसल्याने मी काही अधिकाऱ्यांचे संपर्क दिले.
त्यानंतर त्यांच्यामध्ये काही बोलणे झाल्यानंतर साडेआठच्या सुमारास या पार्टीसंबंधी काही अपडेट येणार असल्याचा कॉल आला. त्यावेळी पहिल्यांदा किरण गोसावींची भेट झाली.
त्यानंतर सुनील पाटीलने फोन करून पार्टीत सेलेब्रिटींचा कोण मुलगा आहे हे चेक करायला सांगितले.
त्यावेळी गोसावीने आर्यन खानचे नाव सांगितले.
आर्यनजवळ कोणतेही ड्रग्ज (Aryan Khan Drug Case) नसून त्याला मदत करण्यास सांगितले.
त्यावेळी यामध्ये मध्यस्थी करण्याचे मान्य केले. त्यासंदर्भात परळ येथे पूजाला भेटलो.
पण त्यांच्यात त्यावेळी काय बोलणे झाले हे माहित नाही.
त्यानंतर गोसावी फ्रॉड असल्याने स्पष्ट झाल्याने पुढे काही व्यवहार झाला नसल्याचेही डिसोझाने सांगितले.

हे देखील वाचा

Parambir Singh | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या मालमत्तेवर ‘टाच’?

Ajit Pawar | आयकर विभागाचा अजित पवारांना दणका ! 1000 कोटींची संपत्ती जप्त करण्याचे दिले आदेश

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Aryan Khan Drug Case | aryan khan drug case shahrukhs manager pooja dadlani kiran gosavi and sam dsouza met at paral in mumbai

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update