Aryan Khan Drug Case | शाहरूख खानचा मुलगा आर्यनमुळं माजी मुख्यमंत्री अडचणीत, पोलिसांकडे तक्रार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  आर्यन खान ड्रग्स प्रकरण (Aryan Khan Drug Case) शाहरुख खानसाठी (Shah Rukh Khan) मोठी डोकेदुखी ठरत असल्याचे पहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून या प्रकरणाने वेगळं वळणं घेतलं आहे. आतापर्यंत राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक स्तरांतून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. त्यातच काही राजकीय नेत्यांनी आर्यन खान ड्रग्स प्रकरणाला (Aryan Khan Drug Case) धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये एक नाव जम्मु काश्मीरच्या (Jammu and Kashmir) माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांचे आहे. मेहबुबा मुफ्ती यानी केलेल्या एका वक्तव्याची त्यांना चांगली किंमत चुकवावी लगात असल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या वक्तव्याचे सोशल मीडियात (social media) तीव्र पडसाद उमटले आहेत.

ड्रग्स प्रकरणात (Aryan Khan Drug Case) शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला एनसीबीनं (NCB) अटक केली.
सध्या तो न्यायालयीन कोठडीत (judicial custody) असून या प्रकरणावर उद्या (बुधवार) सुनावणी होणार आहे.
यासगळ्या परिस्थितीत मेहबुबा मुफ्ती यांनी एक वादग्रस्त वक्तव्य (Controversial statement) केलं आहे.
त्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसत आहे. एवढंच नाही तर मुफ्ती यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल करण्याची मागणी होत आहे.

काय म्हणाल्या मुफ्ती ?

मेहबुबा मुफ्ती यांनी ट्विट करत म्हटलं होतं की, चार शेतकऱ्यांच्या हत्येचा आरोपी असलेल्या केंद्रीय मंत्र्यांच्या मुलावर कारवाई करुन उदाहरण देण्याऐवजी केंद्रीय यंत्रणा फक्त अडनाव खान असल्याने 23 वर्षाच्या मुलाच्या मागे लागली आहे.
भाजपच्या (BJP) मतदारांना खूश करत त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुस्लिमांना (muslims) टार्गेट केलं जातं ही न्यायाची विटंबना आहे, असे मुफ्तींनी म्हटले होते.

 

गुन्हा दाखल करण्याची मागणी

मेहबुबा मुफ्ती यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे त्या अडचणीत सापडल्या आहे.
याविषयी सुत्रांकडून समजलेल्या माहितीनुसार, मेहबुबा मुफ्ती यांच्यावर गुन्हा दाखल करावा.
अशी मागणी तक्रारदार वकीलानं (lawyer) केली आहे. जाणीवपूर्व एका विशिष्ट धर्माच्या लोकांना लक्ष्य केले जात आहे.
एका राजकीय पक्षाची ही मतांसाठीची खेळी आहे.
मुफ्ती यांनी दोन समुहांमध्ये वाद आणि तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
याप्रकरणी दिल्लीतील एका वकीलानं मुफ्ती यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

 

Web Title : Aryan Khan Drug Case | former cm of Jammu and Kashmir mehbooba mufti said aryan khan being targeted for his surname

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

BJP MLA Madhuri Misal | तळजाई वन्य प्रकल्पाला भाजपचा विरोधच – आमदार माधुरी मिसाळ

Facebook New Design | फेसबुकचा मोठा निर्णय ! FB आत नव्या ‘रंगात’ अन् नव्या ‘ढंगात’, जाणून घ्या काय-काय होणार बदल

Cinema halls and Multiplexes Reopen | राज्यात ‘या’ तारखेपासून उघडतील चित्रपटगृह आणि मल्टीप्लेक्स, ठाकरे सरकारने जारी केले एसओपी