Aryan Khan Drug Case | फरार किरण गोसावीचा अखेर ठावठिकाणा लागला; पोलिसांसमोर सरेंडर होणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  Aryan Khan Drug case | आर्यन खान अटक (Aryan Khan Drug Case) प्रकरणानंतर अनेक घडामोडींना वेग येताना दिसत आहे. पंच प्रभाकर साईलने केलेल्या खळबळजनक आरोपानंतर फरार असलेल्या किरण गोसावी (Kiran Gosavi) आता समोर आला आहे. किरण गोसावीने आपण पोलिसांना शरण येणार असल्याचं प्रसार माध्यमांशी संपर्क साधून स्पष्ट केलं आहे. त्याचबरोबर त्याने खंडणी घेतल्याचे आरोप देखील फेटाळले आहेत.

 

मागील काही दिवसांपासून किरण गोसावी हा फरार होता. शेवटी त्याचा थांगपत्ता लागला. किरण गोसावीने (Kiran Gosavi) सांगितले की,
प्रभाकर साईल याने 25 कोटींच्या खंडणीचे केले आरोप हे निराधार आहे. मी कोणतीही खंडणी मागितली नाही.
शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) मॅनेजर पूजा ददलानी (Pooja Dadlani) यांच्याशी कधीही भेटलो नाही.
त्यामुळे अशी कोणतीही खंडणी मागितली नव्हती. तर, मला माझ्या खबऱ्याकडून माहिती मिळाली होती. त्यानुसार एनसीबीला (NCB) माहिती दिली होती. त्यानंतर क्रुझवर कारवाई केली.
आर्यन खानसोबत जो सेल्फी काढला होता, तो सेल्फी एनसीबीच्या ऑफिसमध्ये काढला नव्हता तर तो क्रुझवर काढला होता.
असं किरण गोसावी याने सांगितलं (Aryan Khan Drug Case) आहे.

दरम्यान, आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील स्वतंत्र साक्षीदार प्रभाकर साहिल (Prabhakar Sahil) यांनी सोमवारी मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचच्या सहआयुक्तांची भेट घेतली आहे.
तसेच त्यांनी न्यायालायात एका प्रतिज्ञापत्र दाखल केलं असून त्यात त्यांनी एनसीबीवर खंडणी वसूल करण्याचा आरोप केले आहेत.
तर, पुढे बोलताना किरण गोसावी म्हणाला की, माझ्या जीवाला धोका आहे.
3 तारखेनंतर अनेक खंडणीचे कॉल आले. त्यावर राजकारण सुरू आहे. असं ते म्हणाले.

 

Web Title : Aryan Khan Drug Case | kiran gosavi talk to media and said he will surrender police

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Corporation GB | नाना पेठेतील ‘दि डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया’ संस्थेस 30 वर्षे भाडेकरार वाढीस मुदतवाढ;; सर्वसाधारण सभेत एकमताने निर्णय (Live Video)

NCB Officer Sameer Wankhede | वारंवारच्या आरोपांविरोधात NCB अधिकारी समीर वानखेडेंची कोर्टात धाव; एनसीबीचाही अर्ज

Shambhuraje Desai | गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाईंनी घेतली पोलिसांची ‘झाडाझडती’, अधिकार्‍याचे उपटले कान (व्हिडीओ)