Aryan Khan Drug Case | आर्यन खानचे NCB ला वचन; म्हणाला – ‘मी एक जबाबदार नागरिक बनणार’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Aryan Khan Drug Case | कार्डेलिया क्रूझवर एनसीबीने मारलेल्या छाप्यात मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त केले आहे. याप्रकरणी ‘स्टारकिड’ आर्यन खान याच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. सध्या त्याच्या जामिनावर चर्चा रंगली असतानाच एक नवी माहिती समोर आली आहे. एनसीबीचे अधिकारी तसेच स्वयंसेवी संस्थांकडून आर्यन खानचे (Aryan Khan Drug Case) समुपदेशन करण्यात येत आहे. महत्वाचे म्हणजे आर्यन स्वतः यापुढे व्यसनापासून दूर राहून जबाबदार नागरिक बनण्याची ग्वाही अधिकाऱ्यांना देत  आहे.

दोन एनजीओ आणि अधिकाऱ्यांकडून आर्यन व क्रूझवर अटक केलेल्या ७ जणांवर एनसीबीचे कार्यालय (NCB Office) आणि आर्थर रोड तुरुंगात जाऊन समुपदेशन करण्यात येत आहे.
आर्यनसह ज्या सात जणांना अटक केली आहे ते सर्वजण ३० वर्षाच्या आतील आहेत.
त्या सर्वांना समीर वानखेडे यांच्यासह अन्य अधिकारी व स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांकडून व्यसनाचे दुष्परिणाम, देशाच्या हानीबद्दल माहिती देऊन त्यापासून परावृत्त केले जात आहे.
एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा एनसीबीच्या कार्यपद्धतीचा एक भाग असून समुपदेशनाला आर्यन सकारात्मक प्रतिसाद देत आहे.
प्रत्येक अधिकाऱ्याचे तो लक्षपूर्वक ऐकतो. इतकंच नाही तर त्यांच्या सूचनांचे पालनही करत आहे.
यापुढे आपण व्यसनापासून दूर राहू, समाजातील गरीब, वंचित घटकांच्या मदतीसाठी कार्यरत राहू,
असे आश्वासन आर्यनने अधिकाऱ्यांना दिले आहे.

हे देखील वाचा

Anti Corruption Bureau Pune | पुण्यातील लाचखोर उपायुक्त नितीन ढगेच्या घरात सापडले 2.81 कोटींचं ‘घबाड’; ‘बेनामी’चा होणार पर्दाफाश

Mohan Bhagwat | ‘370 कलम रद्द केल्यानंतरही जम्मू काश्मीरमधील समस्येचं पूर्णपणे निराकरण नाही’

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Aryan Khan Drug Case | Mumbai cruise drug party case aryan khan taking counseling lessons jail news in marathi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update