Aryan Khan Drug Case | आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील तपास अधिकाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Aryan Khan Drug Case | बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Bollywood Actor Shah Rukh Khan) याचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. या प्रकरणाचा (Aryan Khan Drug Case) तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांवर (Investigating Officers) बडतर्फीची कारवाई (Dismiss) करण्यात आली आहे. आर्यन खान याला कार्डेलिया क्रूजवरुन (Cordelia Cruise) एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी 2 ऑक्टोबर 2021 रोजी अटक (Arrest) केली होती.

नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोचे (NCB) अधिकारी विश्वविजय सिंग (Vishwavijay Singh) यांना बडतर्फ करण्यात आले आहे. याशिवाय विश्वनाथ तिवारी (Vishwanath Tiwari) यांच्यावर देखील बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. दोघांना वेगवेगळ्या प्रकरणामध्ये बडतर्फ करण्यात आले आहे. विश्वनाथ तिवारी यांनी विनापरवानगी परदेशवारी केल्याचा आरोप आहे. तर विश्वविजय सिंग यांना 2018 च्या एका प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. संबंधित अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश राकेश अस्थाना (Rakesh Asthana) यांनी दिले होते.

मुंबई एनसीबीच्या पथका विरोधात आरोप झाल्यानंतर कार्डेलिया छापा प्रकरणी वेगळी चौकशी करण्यात आली.
ही चौकशी नोव्हेंबर 2021 मध्ये संपली. यानंतर सात अधिकाऱ्यांच्या विरोधात विभागीय कारवाई
(Divisional Action) सुरु होती. मात्र, या चौकशीत काय झालं हे समोर आलं नाही.
आर्यन खानसह इतरांना एनसीबीकडून ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी (Aryan Khan Drug Case) अटक केली होती. मात्र पुराव्याच्या अभावी आर्यन खानला जामीन दिला होता.

एनसीबीच्या छाप्याची चौकशी करण्यासाठी उप महासंचालक संजय कुमार सिंह (DyDG Sanjay Kumar Singh)
यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी (SIT) स्थापन करण्यात आली होती.
यामध्ये एसआयटीला आरोप सिद्ध करण्यासाठी छाप्यात आर्यन ड्रग्ज तस्करी करत असल्याचे पुरावे सापडले नाहीत.
यानंतर एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांची दुसरीकडे बदली करण्यात
आली होती.

Web Title :-   Aryan Khan Drug Case | NCB 2 investigation officer dismissed who involve in aryan khan case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pakistan Ex PM Imran Khan Arrested | पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरिक ए इन्सान पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांना अटक (Video)

Pune Police Inspector Transfer | पुणे पोलिस आयुक्तालयातील 2 वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

MP Shrikant Shinde | ‘मला अजून उलगडायला लावू नका…’; श्रीकांत शिंदेंचा आदित्य ठाकरेंना इशारा (व्हिडिओ)